आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगता यायला पाहिजे. हा आनंद आपल्याला आपल्या आवडी-निवडी, कला-छंद जोपासून मिळतो. तुमचं वय काहीही असो तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणताही छंद जोपासू शकता, तुमची कला जोपासू शकता. तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळेल ती करू शकता त्यासाठी फक्त तुमची इच्छा शक्ती चांगली पाहिजे. वय हा फक्त आकडा आहे! हे सिद्ध करणारा एका आजींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहेत कारण व्हिडीओमध्ये एक मराठमोळ्या आजीबाई आपल्या नातवाच्या खांद्यावर बसलेल्या दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमधील आजीबाईंचा मराठमोळा पेहराव केला आहे. आजीबाईंच्या डोक्यावर भगवा फेटा बांधला आहे. नातवाच्या खांद्यावर बसलेल्या आजी शिव गर्जना करत आहे. “छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी, जय शिवाजी! छत्रपती संभाजी महाराज की जय! हर हर महादेव”

व्हायरल व्हिडिओ ७ जून रोजी पोस्ट केला आहे, या दिवशी तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती होती. व्हायरल व्हिडिओ vighnesh.sawant2 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे.

नेटकऱ्यांनी,

व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट कर अनेकांनी आजीबाईंच्या उत्साहाचे कौतुक केले. व्हिडीओवर कमेट करत एका मुलीने सांगितले की, “ती माझी पणजी आजी आहे.” तर दुसऱ्याने म्हटले त्यांची माशवी आहे.

आणखी एकाने कमेंट केली की, आजीबाई बाजारपेठेत पोवाडा पण खूप अप्रतिम म्हणत होत्या”

दुसऱ्याने म्हटले की, वय कितीही असू दे लागते ती प्रबळ इच्छाशक्ती!”

तिसऱ्याने म्हटले की,” या आजी रायगडावरती चालत आल्या होत्या आणि चालतच खाली उतरल्या. सार्थ अभिमान वाटतो आजींचा”

पाचव्याने म्हटले की, “शिवरायांचे नाव घेऊन वृद्धांना पण तरुण झाल्यासारखे वाटते”

सहावा म्हणाला, “अबब, काय ती उर्जा! ब्रँड मराठा”