Viral Video Man Blocks Road In Santa Cruz For Dandiya : मुंबईत वाहतुकीची प्रचंड समस्या आहे. वाहतूककोंडीस कारणीभूत ठरलेल्या अनेक कारणांपैकी एक वाहनांची वाढलेली संख्या. त्यामुळे अनेक जण ट्रेन किंवा मेट्रोने प्रवास करतात. पण, कमी अंतराच्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा,बाईकचा वापर सोयीस्कर ठरतो. पण, यामध्ये सुद्धा अनेक नागरिक सणांच्या वेळी सार्वजनिक रस्त्यांचा गैरवापर करतात आणि मग एकच गोंधळ उडतो. मुंबईतील सांताक्रूझ येथीलअसाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह दिसतो आहे. त्यामुळे बिल्डिंगच्या परिसरात, मैदानात आदी ठिकठिकाणी अनेक जण गरबा खेळताना दिसतात. तर पत्रकार रोहित खिलनानी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. सांताक्रूझ पश्चिमेकडील १७ व्या रस्त्यावर राजेश खन्ना गार्डनजवळ एक माणूस रस्त्याच्या मध्यभागी उभे असल्याचे दिसून आले आहेत. पुढे दांडिया गरबा खेळत असल्यामुळे तो गाड्या पुढे जाण्यापासून रोखत आहे आणि त्यांना दुसरीकडे वळवत आहे आणि सणाच्या वेळी सार्वजनिक रस्त्यांच्या गैरवापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आहे.

ही घटना सांताक्रूझ पश्चिमेकडील १७ व्या रस्त्यावर, राजेश खन्ना गार्डनजवळ घडली. या गोष्टीमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांपैकी खिलनानी यांनी हा व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केला आणि मुंबई पोलिस, वाहतूक पोलिस आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केले. त्यांनी १०० वर फोन करून या अडथळ्याबद्दल तक्रार दाखल केल्याचेही नमूद केले. त्यांच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते: “एका माणसाने १७ वा रस्ता, सांताक्रूझ पश्चिम पूर्णपणे बंद केला आहे. त्याचे काही मित्र रस्त्यावर दांडिया खेळत असल्याने एकही गाडी आत येऊ देत नाही. त्यांनी आधीच १०० वर फोन करून तक्रार केली आहे. ” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rohitkhilnani या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट केली आहे आणि “हा पत्ता पुरेसा नाही. कृपया अचूक पत्ता सांगा” खिलनानी यांनी तातडीने “जसुदबेन शाळेच्या कोपऱ्यापासून राजेश खन्ना गार्डनपर्यंतचा रस्ता. सांताक्रूझ पश्चिमेकडील राजेश खन्ना गार्डनजवळ, १७ व्या रस्त्यावरील ग्रँड्यूअर इमारतीबाहेर गोंधळ सुरु आहे” ; असा व्यवस्थित पत्ता नमूद केला आहे. या देवाणघेवाणीनंतर, मुंबई पोलिसांनी पुष्टी केली की, योग्य कारवाईसाठी तपशील सांताक्रूझ पोलिस स्टेशनला पाठवण्यात आला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनीही प्रतिसाद दिला आणि नागरिकांना आश्वासन दिले की सांताक्रूझ वाहतूक विभागाला परिस्थिती हाताळण्यासाठी सतर्क करण्यात आले आहे.