Father Dance Video: मुलगी ही खूप नशिबान लोकांच्या घरात जन्माला येते. ज्यांनी आयुष्यात काही चांगली कामं केली आहेत त्यांना नशिबात मुलीचा बाप होण्याचं भाग्य मिळते. आजही काही घरात मुलगी जन्माला आली तर तो शाप मानला जातो. पण जगात असेही लोक आहेत जे एका मुलीचा बाप होणे म्हणजे स्वत:ला भाग्यवान समजतात. मुलगी आणि वडिलांचं नातं खूप खास असतं. लेक झाली की वडील आनंदाने जल्लोष करतात, मात्र हेच वडिल आपल्या काळजाचा तुकडाही हसत हसत परक्याच्या हातात देतात.
असं म्हणतात की मुलीचं तिच्या वडिलांशी असणारं नातं हे जरा जास्तच खास असतं. लहानपणापासूनच मुली मोठ्या होताना त्यांच्या पहिल्या मित्रापासून ते त्यांच्या पहिल्या सुपरहिरोपर्यंत हे वडीलच त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. बरं वडिलांच्या बाबतीतसुद्धा तेच. लेक म्हणजे जीव, असं म्हणणारे तुमचेही बाबा असतील. अशा या ला़डक्या बाबांचा तुम्ही कधी बेभान डान्स पाहिलाय का? तर हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही किमान एकदातरी वडिलांना तो दाखवाल आणि म्हणाल बघा किती छान नाचताहेत ते..
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आनंद झळकेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ”शादी जोडा पहनके आई जो बन ठनके वही तो मेरी स्वीट हार्ट है” या गाण्यावर नवरीचे बाबा डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यावर अगदी हुबेहूब डान्स स्टेप्स करत जोशात डान्स करताना नवरीचे वडिल दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @phoenix_wedding_choreography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “जेव्हा तुमचे वडील तुमच्या लग्नाबद्दल तुमच्यापेक्षा जास्त उत्साहित असतात” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.१ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “किती छान नाचतायत हे” तर दुसऱ्याने “खूपच क्यूट” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “बापाचं काळीज शेवटी”
