Viral Video: गोवा हे देशातील प्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे. गोवा म्हंटल की, डोळ्यासमोर येतो तो समुद्र, समुद्रकिनारा, थंडगार वारा आणि निवांत जागा. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्या बरोबर येथील खाद्यपदार्थ (See food), संस्कृती, राहणीमान व व विविध ठिकाणेही बरीच प्रसिद्ध आहेत. पण, इथे भेट देणारे अनेक पर्यटक येथील प्रसिद्ध ठिकाणांवर गैरवर्तन करताना दिसून येतात. तर आज सोशल मीडियावर गोव्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे दोन तरुणींचे कृत्य पाहून तुम्हालाही नवल वाटेल.

गोव्यातील प्रसिद्ध पर्रा रोडवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्या ‘डियर जिंदगी’ या चित्रपटातील एका सीनचं इथे चित्रीकरण झालं होतं. इथे अनेक नारळाची झाडे आहेत. त्यामुळे गोवा फिरायला येणारे अनेक पर्यटक इथे सेल्फी आणि व्हिडीओ आवर्जून काढतात. पण, अनेक पर्यटक इथे कार, दुचाकी पार्क करतात त्यामुळे इतर वाहन चालकांसाठी अडथळा निमार्ण होतो. तर अनेक पर्यटक रस्त्याच्या मधोमध उभे राहून फोटोज काढतात त्यामुळे इथे अनेकदा वाहतूक कोंडीसुद्धा होताना दिसून येते.तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे

हेही वाचा…जेसीबी चालकाचा अनोखा स्वॅग! VIDEO पाहून आनंद महिंद्राही झाले इम्प्रेस; म्हणाले, ‘प्रत्येक कामासाठी…’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, गोव्यातील प्रसिद्ध पर्रा रोड म्हणजेच कोकोनट ट्री रोडवरून दोन जोडपे दुचाकीवरून प्रवास करत आहेत. जोडप्यातील तरुण दुचाकी चालवत आहेत. तर तरुणी दुचाकीवर विरुद्ध दिशेला तोंड करून बसल्या आहेत. तसेच आश्चर्याची गोष्ट अशी की, दुचाकी चालवणाऱ्या तरुणांनी डोक्यावर हेल्मेट सुद्धा घातलेलं दिसत नाही आहे. तसेच यातील एक तरुणी यादरम्यान तिच्या फोनमध्ये शूट सुद्धा करताना दिसत आहे. दुचाकी मागून येणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने हा व्हिडीओ शूट करून घेतला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @Herman_Gomes एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या जोडप्याचे कृत्य पाहून युजरने हा व्हिडीओ पोस्ट करीत लिहिले की, “गोव्याला भेट देणाऱ्या प्रत्येक भारतीय पर्यटकांसाठी हा संदेश आहे. कृपया राज्यात प्रवेश करण्यापूर्वी तुमचे वर्तन चांगले व प्रभावी ठेवा व कृपया नागरिकांसारखे कृत्य करा. हे उत्तर गोवा आहे आणि इथे नेहमीचं अशा प्रकारचे कृत्य दिसून येतात” ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.