Viral Video: सध्याच्या धावपळीच्या जीवनात अतिरिक्त परिश्रमामुळे मनावर अनेकदा ताण येतो. ऑफिसमध्ये काम करताना किंवा घरातील एखाद्या गोष्टीचा तणाव न घेता त्यातून सोपा मार्ग काढणे, ऑफिसमधील काम हसत खेळत करणे हे नेहमीच सोईस्कर ठरते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी जेसीबी चालकाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात जेसीबी चालकाची अनोखी शैली पाहून ते प्रभावित झाले आहेत.
काय आहे व्हिडीओत ?
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, जेसीबी चालक एक मजेशीर खेळ खेळत आहे. काही पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या जमिनीवर रांगेत ठेवल्या आहेत. तर या रांगेत लावलेल्या पाण्याच्या बाटल्या जेसीबीच्या सहाय्याने अगदीच मजेशीर पद्धतीने उचल्या जात आहेत. चालक प्रत्येक बाटलीवर जेसीबीचा पंजा मारतो आणि त्यामुळे बाटली उडते आणि गोल फिरून जेसीबीच्या पंजामध्ये येते. एकदा पाहाच जेसीबी चालकाचा अनोखा स्वॅग.
व्हिडीओ नक्की बघा :
तर हा व्हायरल व्हिडीओ सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पाहिला आणि एक्स (ट्विटर)वर रिपोस्ट करून लिहिलं की, ” प्रत्येक कामासाठी कौशल्ये आवश्यक असतात. कधी कधी ते मिळवण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करावे लागतात. पण, ही कौशल्ये फक्त दैनंदिन कामांसाठी आवश्यक वाटू शकतात. पण, काही लोकांमध्ये त्यांचे कौशल्य वापरून त्यांचे काम अधिक मनोरंजक कसं करता येईल याची क्षमता असते”; अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे.
रस्ता दुरुस्त करणे, खोदकाम करणे असो तुम्हाला नेहमी जेसीबी वाहन दिसून येईल. उन्हाळा असो किंवा पावसाळा हे कर्मचारी अनेक संकटांमध्ये रहिवाशांची मदत कारण्यासाठीसुद्धा धावून जातात. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा जीव वाचवतात. पण, आज या जेसीबी चालकाचे अनोखे रूप पाहायला मिळालं आहे; ज्यात रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या बाटल्या उचलण्यासाठी त्यांनी भन्नाट युक्ती शोधून काढली आहे, जे पाहून आनंद महिंद्राही प्रभावित झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.