पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत बहुजन विकास आघाडीकडे सर्वच पक्षांनी पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष ठाकूर यांनी मलाच सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा अशी गुगली टाकली आहे. सर्व पक्षांनी मला पाठिंबा द्यावा असा व्हिडियो पक्षाने प्रसारित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील महत्वाच्या मानल्या जाणार्‍या मतदारसंघात पालघर लोकसभा मतदारसंघाचा समवाेश होतो. हा मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी) राखीव आहे. जिल्ह्याच्या राजकारणात बहुजन विकास आधाडीची महत्वाची भूमिका असते. बविआचे ३ आमदार असून वसई विरार मध्ये पक्षाचे प्राबल्य आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी बविआकडे पाठिंबा मागितला होता. परंतु नुकताच पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आणि इतर पक्षांनीच मला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते. महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या प्रचार सुरू झाला आहे. तर महायुतीतर्फे अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. शिवसेनेचे (शिंदे गट) राजेंद्र गावित हे संभाव्य उमेदवार मानले जातात. पण भाजप की शिवसेना हा घोळ सुरू आहे. ही संधी पाहून ठाकूरांनी पुन्हा इतर पक्षांनी मला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे.

याबाबत ठाकूरांनी एक चित्रफित प्रसारीत केली आहे. त्यामध्ये सर्व पक्षांशी चांगले संबंध असल्याचे म्हटले आहे. मी जिल्ह्याच्या विकासकामांसाठी नेहमी प्रयत्नशील असतो. माझा पाठिंबा मागण्यापेक्षा तुम्हीच मला पाठिंबा द्या, असे आवाहन ठाकूर यांनी या चित्रफितीच्या माध्ममातून केले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hitendra thakur release video appealed to all political party for support in palghar lok sabha election asj