भाईंदर : देशभरात अमली पदार्थाची निर्मिती करून विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाला मध्यवर्ती गुन्हे शाखेला यश आले आहे. एकूण ३२७ कोटीचा साठा जप्त करून १५ जणांना आता पर्यंत अटक करण्यात आली आहे. ही टोळी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा म्होरक्या सलीम डोळा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत पोलिसांकडून शहरात नाकाबंदी राबवण्यात येत होती. यावेळी १५ मे रोजी शोएब मेमन व निकोलस हे दोन व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मिरा भाईंदर मध्ये येत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविराज कुराडे यांना मिळाली होती. त्यावरून पोलीसांनी घोडबंदर येथील चेना भागात सापळा रचून आरोपीना ताब्यात घेतले. यात आरोपीकडून दोन कोटी किंमतीचे जवळपास एक किलो एमडी ड्रग्स पोलिसांना मिळाले होते. सदर आरोपींची पोलीस चौकशी केली असता आरोपीना तेलंगणा येथून हे अमली पदार्थ आल्याचे माहिती समोर आली .त्यामुळे हा अमली पदार्थ साठा तयार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक तेलंगणा येथील विकाराबाद जिल्ह्यात गेले. यातून नासिर उर्फ बाबा शेख आणि दयानंद उर्फ दया माणिक या आरोपीना अटक करून २५ कोटी किंमतीचे एम. डी आणि कारखाना पोलिसांनी जप्त केला होता.

हेही वाचा : विरार रेल्वे स्थानकात थरार, रेल्वे पूलावर महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला

यावेळी अधिक तपास केला असता अमली पदार्थाची मोठी टोळी सक्रिय असलेले पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून वाराणसी, महाराष्ट्र , आणि गुजरात येथे शोध मोहीम राबवून अन्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात पैशाची देवाण-घेणाव व इतर गोष्टीमध्ये मुख्य सूत्रधार आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा मोरक्या सलीम डोळा असल्याचे स्पष्ट झाले आहे.तर चौकशीअंती पोलिससांनी एकूण १५ आरोपीना अटक करून एकूण ३२७ किंमतीचे एम. डी जप्त केले. याशिवाय आरोपीकडून तीन पिस्तूल, एक रिवाल्वर आणि ३३ जिवंत काढत असे देखील हस्तगत करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कुऱ्हाडे व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.

व्यवहाराचे मुख्य केंद्र गुजरात

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत असताना पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम चा मोरक्या सलीम डोळा हा गुजरातच्या सुरत येथील व्यापारी झूल्फीकार उर्फ मूर्तझा कोठारी मार्फत व्यवहार करत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी कोठारीला ताब्यात घेऊन त्याकडून १० लाख रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच ही रक्कम मुंबईच्या मुस्तफा फर्निचर वाला या अंगडिया (हवाला ) मार्फत पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या

घटनाक्रम

  • १५ मे रोजी चेना ( महाराष्ट्र )येथून शोएब मेमन आणि निकोलस टायटस आरोपींना ताब्यात घेऊन १ किलो एम डी जप्त
  • १७ मे रोजी तेलंगणा येथून दयानंद उर्फ दया मलिक व नसीर उर्फ बाबा शेख यांना ताब्यात घेऊन १०३ ग्रॅम पावडर आणि २५ किलो कच्चे एमडी ( २५ कोटी किंमतीचे ) जप्त.
  • दयानंद दिलेल्या माहितीनुसार वाराणसी ( उत्तर प्रदेश )येथून घनश्याम सरोज आणि मोहम्मद शकील यांना तेलंगणा ताब्यात घेत ७१. ९० ग्रॅम एम. डी जप्त.
  • तसेच २७ मे रोजी भरत उर्फ बाबू जाधव या आरोपीला महाराष्ट्रातील वाशिंद येथून अटक करून एमडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.
  • ३१ मे रोजी गुजरातच्या सुरत येथून व्यापारी झूल्फीकार उर्फ मुर्तजा कोठारी ला अटक.तसेच मुंबई येथून मुस्तफा फर्निचर वाला ताब्यात
  • अमली पदार्थाची तस्करी करणारे बाबू खान,मोहम्मद खान आणि अहमद शाह यांना उत्तर प्रदेशातीत आजमगड येथून अटक
  • तर २५ जुन रोजी आमिर खान,मोहम्मद शादाब आणि वीरेंद्र सिंग यांना देखील उत्तर प्रदेश मधील आजमगड मधून अटक
  • तर आमिर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार १ जुन अभिषेक सिंह याला नालासोपारा येथून अटक करण्यात आली.
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhaindar drugs of rupees 327 crore seized dawood ibrahim gang member arrested mumbai print news css