भाईंदर :-पावसाच्या हजेरीमुळे पश्चिम मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.सकाळपासून गाड्या दहा मिनटे उशिरा धावत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
शुक्रवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण झाले असून पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतूकवर देखील होऊ लागला आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गांवरील विरारहून मुंबई च्यादिशेने जाणाऱ्या गाड्या दहा मिनिटे उशिराने धावत आहेत.यामुळे रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून प्रवाशांची तारांबळ उडत आहे.तर मिळेल त्या गाडीत चढून प्रवास करणाऱ्याची संख्या वाढल्यामुळे गर्दीची समस्या उभी राहिली आहे.
प्रामुख्याने उशिराने धावत असलेल्या या गाड्याचा वेग मिरा रोड नंतर काहींश्या प्रमाणात वाढत आहे. परंतु विरार ते नायगाव पर्यंत गाड्या अत्यंत हळूहळू धावत असल्याने प्रवाशाच्या कालावधीत वीस मिनिट अधिकची भर पडली असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.