पुनर्विकास म्हटलं की, रहिवासी साशंक असतात; परंतु त्यांना त्यांच्या जुन्या जीर्ण झालेल्या आपल्या घराचा पुनर्विकास व्हावा असेही वाटत असते. थोडक्यात, रहिवाशांना पुनर्विकास नक्की हवा आहे; परंतु त्यासाठी भरवशाचा असा विकासक मिळणे दुर्मीळ झाले आहे. त्यामुळेच बीडीडी चाळींचा यशस्वी ठरलेला पुनर्विकास हे एक आदर्श उदाहरण म्हणून ठरणार असेल तर ‘पुनर्वसनाचा आदर्श नमुना’ म्हणून या प्रकल्पाची माहिती जनतेच्या हितासाठी सर्वांना उपलब्ध करून द्यावी.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प फार न रखडता आता पूर्णत्वास आला असून, त्या नवीन घरांचा ताबा आता मूळच्या रहिवांशाकडे सोपविण्यात आला आहे. हा पुनर्विकास होत असताना म्हाडा आणि रहिवासी यांच्यात जे काही करारमदार झाले असतील, ते सामान्य जनतेसाठी म्हाडाने ‘जुन्या चाळींच्या पुनर्विकासासाठी आदर्श करारमदार संहिता’ स्वरूपात जाहीर करता येतील का पाहावे. कारण मुंबई शहरात, कित्येक वर्षांपूर्वी बांधलेल्या आणि आता जरा जर्जर अवस्थेत असलेल्या कितीतरी चाळींतील रहिवासी मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर घेऊन कसेबसे जीवन कंठत आहेत. खासगी किंवा सरकारी पुनवर्सन प्रकल्पाच्या बाबतीत पुनर्विकास काही ना काही कारणाने लांबत गेला, तर अशा मध्यमवर्गीय रहिवाशांच्या हालअपेष्टांना पारावार राहत नाही. अशी उदाहरणे बरीच आहेत.

परिणामी पुनर्विकास म्हटलं की, रहिवासी साशंक असतात; परंतु त्यांना त्यांच्या जुन्या जीर्ण झालेल्या आपल्या घराचा पुनर्विकास व्हावा असेही वाटत असते. थोडक्यात, रहिवाशांना पुनर्विकास नक्की हवा आहे; परंतु त्यासाठी भरवशाचा असा विकासक मिळणे दुर्मीळ झाले आहे. त्यामुळेच बीडीडी चाळींचा यशस्वी ठरलेला पुनर्विकास हे एक आदर्श उदाहरण म्हणून ठरणार असेल तर ‘पुनर्वसनाचा आदर्श नमुना’ म्हणून या प्रकल्पाची माहिती जनतेच्या हितासाठी सर्वांना उपलब्ध करून द्यावी. सरकारच्या आणि रहिवाशांच्या दृष्टीने हे उपयुक्त ठरेल असे वाटते. सदर बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, पुनर्बाधणीचा एक पथदर्शी प्रकल्प या स्वरूपात जनतेच्या सोयीसाठी शासनाने त्याला तशी मान्यता देऊन पुढे आणावा असे सुचवावेसे वाटते.

भाडेकरू राहत असलेल्या जुन्या चाळी वस्त्यांमध्ये पुनर्विकास करताना खालील प्रकारच्या काही समस्या असू शकतात :

  • इमारतीच्या मूळ जागेसंबंधात (प्लॉट) मालकी वरून गुंतागुंत असू शकते.
  • नेक वर्षांत रहिवाशांतील काही भाडेकरूंच्या वैधतेबद्दल गुंतागुंत निर्माण झालेली असू शकते.
  • काही भाडेकरूंनी जागेचा वापर अन्य कारणांसाठी केलेला असू शकतो.
  • एका भाडेकरूच्या एकाच इमारतीत एकापेक्षा अधिक जागा असू शकतात.
  • काही भाडेकरूंनी अनधिकृत बांधकाम केलेले असू शकते.
  • काही भाडेकरूंची प्रकरणे काही कारणाने न्यायप्रविष्ट असू शकतात.
  • अचानक बदललेले शासकीय धोरणसुद्धा काही वेळा पुनर्विकास लांबणीवर पडू शकण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

gadrekaka@gmail.com