Gold-Silver Price Today: सोन्याच्या किमतीने गेल्या काही महिन्यात घेतलेली उसळी आता घसरत आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आता आशा निर्माण झाली की, २४ कॅरेट सोन्याचा दर लवकरच १ लाख २० हजारांच्या खाली घसरू शकतो. काल, ५ नोव्हेंबर रोजी देशभरात २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. देशभरात सुवर्ण बाजारपेठेत दिवाळीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, त्यानंतर दोन्हीच्या दरांमध्ये थोड्या-फार फरकाने चढ-उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, डॉलरच्या मूल्यातील बदल आणि गुंतवणूकदारांच्या हालचाली यांचा परिणाम एकूणच सोन्याच्या दरावर दिसून आला आहे.

आज सोन्याचा भाव किती?

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख २० हजार ८१० रूपये आहे. दरम्यान २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ११ हजार ७५० रूपये आहे. काल २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ११ हजार ३५० होता. म्हणजेच १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव कालच्या तुलनेत आज ४०० रूपयांनी जास्त आहे. दरम्यान, १८ कॅऱेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅम भाव ९१ हजार ४३० रूपये एवढा आहे, तो बुधवारच्या तुलनेत ३२० रूपयांनी जास्त आहे. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमती जवळपास ६० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, केरळ, पुणे, विजयवाडा, नागपूर आणि भुवनेश्वर यासारख्या शहरामंध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १२ हजार १९१ रूपये आहे. दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १२ हजार २०६ रूपये आहे. महाराष्ट्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव १२ हजार ०८१ रूपये आहे. म्हणजेच प्रति १० ग्रॅम १ लाख २० हजार ८१० इतका सोन्याचा दर सध्या महाराष्ट्रात आहे.

चांदीची किंमत

आज भारतात चांदीची किंमत प्रति ग्रॅम १५१.५० रूपये आणि प्रति किलो १ लाख ५१ हजार ५०० रूपये आहे. काल, ५ नोव्हेंबर रोजी हा दर प्रति किलो १ लाख ५० हजार ५०० रूपये होता. दरम्यान, चांदीच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. भारतात चांदीच किंमत आंतरराष्ट्रीय किमतीनुसार निश्चित केली जाते. शिवाय ते डॉलरच्या तुलनेत रूपयांच्या हालचालीवर देखील अवलंबून असते. जर डॉलरच्या तुलनेत रूपयांचे मूल्य घसरले आणि आंतरराष्ट्रीय किमती स्थिर राहिल्या तर चांदी अधिक महाग होईल.