राज्यात लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने यंत्रणेवर ताण पडत होता तसेच कामांना देखील उशीर होत होता. त्यामुळे या पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भरती प्रक्रियेमध्ये एकुण ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकुण ३६२८ पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार आहे, जाणून घ्या.

आणखी वाचा- यूपीएससीची तयारी : यूपीएससी परीक्षा : गरज कौशल्य विकासाची

पुणे विभागात एकुण ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. अमरावती विभागात एकुण १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. नागपूर विभागात एकुण ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. औरंगाबाद विभागात एकुण ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. नाशिक विभागात एकुण ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. कोकण विभागात एकुण ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे

त्यामध्ये जिल्ह्यानुसार तलाठी साझे आणि महसूली मंडळे यांसाठी रिक्त पदांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे

पुणे

  • पुणे- ३३१, ५५
  • सातारा- ७७,१२
  • सांगली- ५२,०९
  • सोलापूर- १११,१९
  • कोल्हापूर- ३१,०५

आणखी वाचा: यूपीएससीची तयारी : यूपीएससी : नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप

अमरावती

  • अमरावती- ३४,०६
  • अकोला- ०८,०१
  • यवतमाळ- ५४, ०९
  • बुलढाणा- १०,०२
  • वाशीम- ०,०

नागपूर

  • नागपूर- ९४,१६
  • चंद्रपूर- १३३,२३
  • वर्धा- ५०,०८
  • गडचिरोली- ११४,१९
  • गोंदिया- ४९,०८
  • भंडारा- ३८,०६

औरंगाबाद

  • औरंगाबाद- ११७,१९
  • जालना- ८०,१३
  • परभणी- ७६,१३
  • हिंगोली- ६१,१०
  • बीड- १३८,२३
  • नांदेड- ८४,१४
  • लातूर- ३९,०७
  • उस्मानाबाद- ९०,१५

नाशिक

  • नाशिक- १७५,२९
  • नंदुरबार- ०,०
  • धुळे- १६६,२८
  • जळगाव- १४६, २४
  • अहमदनगर- २०२,३४

आणखी वाचा: Indian Navy MR Recruitment 2022: १०० अग्निवीर पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कोकण

  • मुंबई- १९, ४
  • मुंबई उपनगर- ३१, ३
  • पालघर- ८६,१६
  • ठाणे- ७२,१०
  • रायगड- १४०,२२
  • रत्नागिरी- १०३, १८
  • सिंधुदुर्ग- ९९,१८

अशाप्रकारे एकुण ३११० तलाठी साझे आणि ५१८ महसूली मंडळी अशा एकुण ३६२८ पदांसाठी भरती होणार आहे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment for 3628 talathi posts in maharashtra know the complete process pns