UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दर रविवारी तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रश्न क्र. १

खालीलपैकी योग्य विधान कोणते ते निवडा.

१) कृषी क्षेत्राचा भारताच्या दरडोई उत्पन्नात वाटा १३% आहे.

२) कृषी क्षेत्रातील रोजगार ४३% घटकास रोजगार पुरवतो.

३) कृषी क्षेत्र हे अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्राचा भाग आहे.

४) वरीलपैकी सर्व योग्य

प्रश्न क्र. २

खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ) समुद्राची पातळी वाढणे हे प्रामुख्याने जागतीक तापमनवाढीशी संबंधित घटकांमुळे होते.

ब) महासागरातील जागतिक सरासरी पाण्याची पातळी दरवर्षी ०.१४ इंच (३.६ मिलिमीटर) ने वाढत आहे.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ

२) फक्त ब

३) अ आणि ब योग्य

४) अ आणि ब अयोग्य

प्रश्न क्र. ३

शहरी पुरासंदर्भात योग्य पर्याय निवडा :

अ) अनाधिकृत बांधकाम आणि योग्य ड्रेनेज सिस्टमचा अभाव यामुळे शहरी पूर येतो.

ब) जागतिक तापमानवाढ हे शहरी भागातील पूर्ण येण्याचे महत्त्वाचे कारण आहे.

क) राष्ट्रीय पूर आयोग (नॅशनल कमिशन ऑन फ्लड) नुसार भारतातील सुमारे ४० दशलक्ष हेक्टर जमीन पूरप्रवण आहे.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ

२) फक्त क

३) अ आणि ब

४) वरील सर्व बरोबर

प्रश्न क्र. ४

खालील विधाने महासागर पातळीत होणाऱ्या वाढीची कारणे स्पष्ट करतात यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?

१) ग्रीनलँडमधील बर्फाचे सरासरी नुकसान दुपटीने वाढणे

२) अंटार्क्टिक महाद्वीपावरील बर्फ वितळने

३) हिमनद्याचा आकार वाढणे

४) जागतिक तापमान वाढ

प्रश्न क्र. ५

राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद हे समतेच्या अधिकाराशी संबंधित आहे.

१) अनुच्छेद १४ ते १८

२) अनुच्छेद १९ ते २२

३) अनुच्छेद १२ ते १३

४) अनुच्छेद २३ ते २४

प्रश्न क्र. ६

खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?

१) संविधान, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे

२) पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि प्राणिमात्रांप्रति भूतदया दाखवणे

३) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि सुधारणावाद यांचा विकास करणे

४) राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचे स्मारके व वास्तू यांचे रक्षण करणे

प्रश्न क्र. ७

खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ते सांगा?

१) पीएच स्केल हा नायट्रोजन आयन एकाग्रतेचे प्रमाण सांगते

२) पीएच (pH) स्केल ० ते १४ पर्यंत असते

३) शुद्ध पाण्याचा pH ७ असतो

४) ७ पेक्षा कमी pH असलेली कोणतीही गोष्ट अम्लीय असते

प्रश्न क्र. ८

वाढत्या महासागरी अम्लतेबद्दल खालीलपैकी योग्य असलेले विधान/ने निवडा.

१) जेव्हा कार्बन डायऑक्साइड (CO2) समुद्राच्या पाण्याद्वारे शोषले जाते, तेव्हा रासायनिक अभिक्रिया होतात ज्यामुळे हायड्रोजन आयनांची सांद्रता (concentration) वाढते. या प्रक्रियेचा महासागर आणि तेथे राहणार्‍या प्राण्यांसाठी दूरगामी परिणाम होतो.

२) काही एकपेशीय वनस्पती आणि सीग्रास यांना समुद्रातील उच्च CO2 स्थितीचा फायदा होऊ शकतो, कारण त्यांना जमिनीवरील वनस्पतींप्रमाणेच प्रकाशसंश्लेषणासाठी CO2 आवश्यक आहे.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १

२) फक्त २

३) १ व २ दोन्ही

४) १ व २ दोन्हीं नाही

प्रश्न क्र. ९

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाचा समावेश हा मूलभूत अधिकारामध्ये करण्यात आला?

पर्यायी उत्तरे :

अ) ९२ वी घटनादुरुस्ती

ब) ८६ वी घटनादुरुस्ती

क) ९३ वी घटनादुरुस्ती

ड) ९५ वी घटनादुरुस्ती

प्रश्न क्र. १०

खालीलपैकी कोणत्या भागात ओसाड जमीन सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळते?

पर्यायी उत्तरे :

१) विदर्भ

२) खानदेश

३) पश्चिम महाराष्ट्र

४) कोकण

प्रश्न क्र. ११

खालीलपैकी महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राबद्दल योग्य नसलेले विधान/विधाने ओळखा.

१) ऑगस्ट १९९१ मध्ये महाराष्ट्राने उदारीकरणाचे धोरणा अंगीकारले आहे.

२) महाराष्ट्र राज्य औद्योगीक क्षेत्रात मागासलेले आहे.

३) मुंबई, ठाणे आणि पुणे हे महाराष्ट्रातील अग्रेसर स्तरावरील औद्योगिक केंद्र म्हणून उदयास आले आहेत.

४) महाराष्ट्रात वने , प्राणिज, कृषी, खनिज यावर आधारीत उद्योग आढळतात.

पर्यायी उत्तरे :

१) १ व २

२) फक्त २

३) फक्त ३

४) वरील एकही नाही

प्रश्न क्र. १२

खालीलपैकी योग्य नसलेले विधान ओळखा.

१) भारत देशातील साखर उद्योगामध्ये अग्रेसर राज्य महाराष्ट्र आहे.

२) देशातील राज्यांपैकी महाराष्ट्रात उसाची लागवड तसेच साखर उत्पादन दोन्ही प्रथम प्रमाणात होते.

३) महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना सन १९२० मध्ये अहमदनगर जिल्हयात बेलापूर येथे उभारण्यात आला होता.

४) महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेशमधे सर्वाधिक ऊस उत्पादन घेतले जाते.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त ३

२) फक्त ४

३) फक्त १

४) फक्त २

प्रश्न क्र. १३

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

१) पहिल्या गोलमेज परिषदेनंतर इंग्रज सरकारने काँग्रेससोबत तडजोड करण्याचे ठरवले, त्या वेळी भारताचा व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्वनि व महात्मा गांधी यांच्यात ५ मार्च १९३१ रोजी एक करार झाला.

२) दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित नव्हते.

३) १९३२ मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड अ‍ॅटली यांनी जातीय निवाडा जाहीर केला

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १ बरोबर

२) फक्त २ बरोबर

३) फक्त ३ बरोबर

४) सर्व बरोबर

प्रश्न क्र. १४

पुढील विधानांपैकी योग्य नसलेले विधान ओळखा.

१) महाराष्ट्राचा प्राथमिक खडक बेसॉल्ट हा आहे.

२) महाराष्ट्राचा मुख्य खडक अर्कियन यांना हा आहे.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त १ चूक

२) फक्त २ चूक

३) १ व २ दोन्ही चूक

४) १ व २ दोन्हीं बरोबर

वरील प्रश्नांची उत्तरे

प्रश्न क्र. १-४
प्रश्न क्र. २-३
प्रश्न क्र. ३-४
प्रश्न क्र. ४-३
प्रश्न क्र. ५-१
प्रश्न क्र. ६-४
प्रश्न क्र. ७-१
प्रश्न क्र. ८-३
प्रश्न क्र. ९-२
प्रश्न क्र. १०-४
प्रश्न क्र. ११-२
प्रश्न क्र. १२-२
प्रश्न क्र. १३-१
प्रश्न क्र. १४-४

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc loksatta test series envoirnment polity history geography ecomics question set 3 spb 94