गोविंद डेगवेकर
भाजपला कर्नाटक आणि तेलंगण वगळता दक्षिण भारतातील अन्य राज्यांत प्रवेश करता आलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूसह केरळमध्ये ही संधी भाजप शोधत आहे. त्रिशूर, त्रिवेंद्रमसह कासरगोड, कन्नूरसह पाच लोकसभा मतदारसंघांत भाजपने आपले सारे बळ लावले आहे. राजीव चंद्रशेखर आणि सुरेश गोपी यांच्या विजयाची पक्षाला आशा आहे. राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीतील घटक पक्ष येथे आमने-सामने आहेत. राज्यात नेहमीच काँग्रेसच्या नेतृत्त्वात संयुक्त लोकशाही आघाडी विरोधात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने निर्माण झालेली डावी लोकशाही आघाडी असा सामना रंगतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळूरुमधील तीव्र पाणीटंचाईचा मुद्दा केरळमध्ये उपस्थित झाला आहे. येत्या काही दिवसांत तरी बंगळूरुला मुबलक पाणी मिळणार नाही, असा युक्तिवाद केला जात आहे. त्याआधारेच केरळच्या उद्योगमंत्र्यांनी बंगळूरुतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील मल्याळी तरुणांनी स्वत:च्या राज्यात परत येऊन कामधंदा करावा, असे आवाहन केरळचे उद्योगमंत्री पी. राजीव यांनी केले आहे. नोकरीसाठी परराज्यात गेलेल्या तरुणांना राज्यात पुन्हा आणण्यात राजीव यांना नवा मतदार दिसत आहे.

हेही वाचा >>>थायलंडमध्ये जहाजाला आग, सर्व प्रवासी सुखरूप

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने राज्यातील लोकसभेच्या २० जागांपैकी १९ जागा पटकावल्या. भाजपने केरळमध्ये गेल्या वेळी १५ टक्के मते मिळवली होती.  राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे संघटन आहे. मात्र भाजपला विधानसभा निवडणुकीत एका जागेचा अपवाद वगळता यश मिळालेले नाही. केरळमध्ये २६ टक्के मुस्लीम, तर १८ टक्के ख्रिश्चन मतदार आहेत. भाजपने यंदा एक ख्रिश्चन तसेच एक मुस्लीम उमेदवार दिला आहे. राज्यात काही प्रमाणात ख्रिश्चन मते मिळतील, असा भाजपचा होरा आहे. मग काँग्रेसला याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

डाव्यांच्या लोकशाही आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला पश्चिम बंगाल तसेच त्रिपुरात यंदा फारशी अपेक्षा नाही. त्यामुळे केरळमधूनच अधिकाधिक जागा जिंकण्यावर त्यांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे.

तिरुवनंतपुरम मतदारसंघातून शशी थरूर यांना काँग्रेसच्या वतीने तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. त्यांचा सामना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याशी आहे.

हेही वाचा >>>“आम्ही खोटं-खोटं…”, पंतप्रधान मोदींकडे इशारा करत नितीश कुमारांनी युतीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत; नेमकं काय म्हणाले?

वायनाडवरून वाद

काँग्रेस नेते  राहुल गांधी यांच्या वायनाड येथील उमेदवारीवरून डावी लोकशाही आघाडी आक्रमक झाली आहे. भाजप सत्तेत येऊ नये यासाठी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना झाली आहे. तर मग राहुल भाजपच्या विरोधात का उभे राहत नाहीत. उलट, त्यांना वायनाड मतदारसंघात येऊन डाव्यांच्या विरोधात लढायचे आहे, असे टीकास्त्र केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी सोडले आहे. वायनाड मतदारसंघात राहुल गांधीच्या विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन निवडणूक लढवतील. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अ‍ॅनी राजा यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्या पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्या आहेत.भाजपने केरळमध्ये गेल्या वेळी १५ टक्के मते मिळवली होती.  राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे संघटन आहे. मात्र भाजपला विधानसभा निवडणुकीत एका जागेचा अपवाद वगळता यश मिळालेले नाही. भाजपने यंदा एक ख्रिश्चन तसेच एक मुस्लीम उमेदवार दिला आहे. 

राष्ट्रीय दर्जा टिकविण्याचे आव्हान?

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकविण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला भारतातील किमान चार वा त्याहून अधिक राज्यांत मिळून लोकसभा निवडणुकीत सहा टक्के मते राखावी लागतात आणि लोकसभा निवडणुकीत चार राज्यांत मिळून दोन टक्के जागा जिंकाव्या लागतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्‍सवादी) अस्तित्वात आहे. मात्र, २०२४मधील लोकसभा निवडणुकीत या पक्षाने चांगली कामगिरी न केल्यास ‘माकप’हातोडा,विळा आणि चांदणीचे निवडणूक चिन्ह गमावू शकते, असा इशारा पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि केरळचे माजी मंत्री  ए. के. बालन यांनी दिला आहे.

२०१९चा निकाल

एकूण जागा        २०

संयुक्त लोकशाही आघाडी             १९

डावी लोकशाही आघाडी             १

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp attempt to create a third option in kerala along with tamil nadu in the lok sabha elections amy