Video: मतदार यादीची पुनर्पडताळणीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी बुधवारी बिहार बंदची हाक दिली होती. काँग्रेस खासदार राहुल गांधी हे देखील या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बिहारची राजधानी पाटणा येथे दाखल झाले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. यादरम्यान राहुल गांधी गाडीतून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघाले होते. यावेळी त्यांच्याबरोबर आरजेडी नेते तेजस्वी यादव, मुकेश सहनी यांच्यासह विरोधी पक्षांचे इतर नेतेही होते. मात्र यादरम्यान एक घटना पाहायला मिळाली ज्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

राहुल गांधी त्यांच्या मिरवणुकीच्या ट्रकवर चढले, त्यांच्यानंतर कन्हैया कुमार आणि खासदार पप्पू यादव देखील ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी पुढे त्यांना तसे करू दिले नाही. त्यांना ट्रकच्या खालीच रोखण्यात आले. त्यानंतर हे दोघे गाडीच्या मागे चालू लागले. खासदार पप्पू यादव देखील ट्रकच्या खालीच उभे होते, मात्र राहुल गांधी यांनी त्यांना विचारले नाही.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काँग्रेस नेता कन्हैया कुमार ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र सुरक्षा रक्षक त्यांना रोखतात आणि ट्रकमधून खाली उतरवतात. यावेळी पप्पू यादव देखील खालीच उभे होते.

पप्पू यादव हे काँग्रेसपासून दूर झाले असले तरी ते स्वत:ला राहुल गांधी यांचा समर्थक मानतात. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पूर्णिया येथून लढण्याचा भरपूर प्रयत्न केला होता, मात्र तेजस्वी यादव यांच्यामुळे ते शक्य होऊ शकले नाही.

आरजेडीने येते बीमा भारती यांना तिकीट दिलं आणि पप्पू यादव हे अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी देखील झाले. काधीकाळी पप्पू यादव हे आरजेडीचे सर्वेसर्वा लालू यादव यांच्या जवळचे देखील होते, मात्र नंतर त्यांचे लालू यादव यांच्या कुटुंबाशी वाद झाले,