आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पार्टीने २०२४ ची निवडणूक जिंकली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘नरेंद्र पुतिन’ बनतील, अशी बोचरी टीका भगवंत मान यांनी केली. ते दिल्लीत आम आदमी पार्टीच्या ‘महारॅली’त बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर, आम आदमी पार्टीने राजधानी दिल्लीत केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात महारॅली काढली आहे. दिल्ली सरकारच्या विविध सेवांवर नियंत्रण ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात ही रॅली काढली आहे. दिल्लीतील ‘रामलीला’ मैदानावर या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीतील ‘आप’ नेते आणि मंत्री गोपाल राय आणि ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी रॅलीला संबोधित केलं.

हेही वाचा- VIDEO: “पोलिसांनीच पीडित महिला कुस्तीपटूला ब्रिजभूषण सिंहांच्या कार्यालयात…”, बजरंग पुनियाचा गंभीर आरोप

दरम्यान, या ‘महारॅली’तून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. २०२४ मध्ये भाजपाने निवडणूक जिंकली तर देशात त्यानंतर निवडणुका होणार नाहीत. २०२४ ची निवडणूक भाजपाने जिंकली तर नरेंद्र मोदी हे ‘नरेंद्र पुतिन’ बनतील, अशी खोचक टीका मान यांनी केली.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंनी मान्य केलं होतं की…”, ‘त्या’ चर्चेबद्दल अमित शाहांचा खुलासा

भगवंत मान पुढे म्हणाले, “भाजपा नेते आताच नरेंद्र मोदींना भारताचा ‘मालक’ समजू लागले आहेत. १४० कोटी भारतीयांनी भारताला वाचवायचं ठरवलं तरच देश वाचेल.” केंद्र सरकारने सेवाविषयक अध्यादेशाच्या भूमिकेवर पुनर्विचार करावा आणि दिल्लीतील लोकांच्या हिताला प्राधान्य द्यावे. तसेच सरकारने हा अध्यादेश तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panjab cm bhagwant mann criticise pm narendra modi called narendra putin 2024 loksabha election rmm