मणिपूरसंदर्भातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी ( ९ ऑगस्ट ) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य करताना मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हे भाषण संपल्यानंतर कथितरित्या फ्लाइंग किस दिल्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधी यांचं हे वर्तन ‘स्त्रीद्वेष्टे’ असून या सभागृहाने पूर्वी कधीही अशी असभ्य कृती पाहिली नव्हती, असा हल्लाबोल इराणी यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घडलं काय?

राहुल गांधी हे भाषण झाल्यानंतर सभागृहातून जात असताना भाजपाच्या खासदारांनी त्यांची टिंगल उडवली. त्यानंतर राहुल गांधी मागे वळले आणि त्यांनी सत्ताधारी बाकांकडे बघत फ्लाइंग किस दिला. “राहुल गांधी यांनी स्मृती इराणी आणि इतर महिला खासदारांकडे पाहून ‘फ्लाइंग किस दिल्या’चा आरोप भाजपाच्या खासदार शोभा करंजले यांनी केला. यावर आता दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वामी मालिवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“त्यांच्या कृत्यावर राग येत नाही का?”

स्वाती मालिवाल ट्वीट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “हवेत फेकलेल्या एका कथित फ्लाइंग किसने एवढी आग लागली आहे. पण, दोन रांगा मागेच एक व्यक्ती बृजभूषण बसले आहेत. त्यांनी ऑलिम्पिक कुस्तीपटूंना खोलीत बोलवून, त्यांच्या छातीवर हात ठेवला. कमरेत हात घातला. त्यांचं लैंगिक शोषण केलं. त्यांच्या कृत्यावर राग येत नाही का?” असा सवाल स्वाती मालिवाल यांनी मोदी सरकारला विचारला.

स्मृती इराणी काय म्हणाल्या?

“केवळ स्त्रीद्वेष्टा पुरुषच महिला सदस्य बसलेल्या संसदेमध्ये फ्लाइंग किस देऊ शकतो. सभागृहाने असे वर्तन यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. संपूर्ण देशाने या कुटुंबाची संस्कृती पाहिली आहे,” अशा घणाघाती टीका स्मृती इराणी यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi kiss row swati maliwal tweet brij bhushan sharan singh smriti irani ssa