प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञातांनी मुसे वाला यांच्या गाडीवर गोळीबार केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनीदेखील सिद्धू मुसे वाला यांच्या हत्येनंतर दु:ख व्यक्त केलं आहे. पंजाब सरकारने सुरक्षा काढून घेताच सिद्धू मुसे वाला यांच्यावर हा गोळीबार झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू; रशियाच्या सत्तेवर त्यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

“काँग्रेसचे नेते आणि प्रसिद्ध कलाकार सिद्धू मुसे वाला यांची हत्या करण्यात आल्याचे ऐकून मला धक्का बसला. त्यांच्या हत्येची घटना खूपच दुखद आहे. मुसे वाला यांच्या जगभरातील चाहत्यांना तसेच त्यांच्या परिवाराविषयी मी संवेदना व्यक्त करतो,” अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

हेही वाचा >> प्रसिद्ध गायक सिद्धू मुसे वाला यांची गोळ्या झाडून हत्या, पंजाब सरकारने सुरक्षा काढून घेताच अज्ञातांकडून हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला आपल्या मित्रांसोबत पंजाबमधील मानसा येथे त्यांच्या घरी जात होते. यावेळी प्रवासादरम्यान त्यांच्यावर अज्ञातांनी अचानकपणे गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर ३० ते ४० गोळ्या झाडल्या. त्यामुळे मुसे वाला यांचा मृत्यू झाला. या गोळीबारामध्ये मुसे वाला यांचे दोन मित्र जखमी झाले आहेत. मुसे वाला यांनी २०२२ साली काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना आम आदमी पक्षाचे डॉ. विजय सिंग यांनी पराभूत केले होते.

हेही वाचा >> जम्मू काश्मीर: पाकिस्तानमधून बॉम्ब घेऊन येणारं ड्रोन सुरक्षा दलानं पाडलं, सात मॅग्नेटीक बॉम्ब जप्त

मुसे वाला कोण आहेत?

सिद्धू मुसे वाला हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेसमध्ये प्रवास केला होता. काँग्रेसने त्यांना २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मानसा मतदारसंघातून तिकीट दिले होते. मात्र या निवडणुकीत मानसा यांचा ६३,३२३ मतांच्या फरकांनी पराभव केला होता. जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidhu moose wala shot dead congress leader rahul gandhi comments said deeply shocked and saddened prd