Indian Railways : ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा काही अडचण आल्यास प्रवासी आपत्कालीन साखळी ओढून ट्रेन थांबवतात. पण, ट्रेनमधील आपत्कालीन साखळी खेचण्यासंबंधीचे नियम फार कमी लोकांना माहीत आहेत. कोणत्याही प्रवाशाने विनाकारण किंवा केवळ गंमत म्हणून साखळी ओढली, तर त्या प्रवाशाला दंड आकारला जातो. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षाही केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने ही आपत्कालीन साखळी खेचण्यासंबंधीचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. कारण- भारतीय रेल्वेने आपत्कालीन साखळी खेचण्याच्या नियमात आता बदल केले आहेत. आता विनाकारण ही साखळी खेचल्यास प्रतिमिनिट आठ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वेवने कोणतेही गंभीर कारण नसताना साखळी ओढणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याबाबत नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार दंडाची रक्कम पूर्वी ५०० रुपये होती, ती आता वाढवण्यात आली आहे. यामुळे विनाकारण ट्रेनची साखळी ओढणे आता चांगलेच महागात पडणार आहे.

साखळी खेचणाऱ्याला प्रति मिनिटे आठ हजारांचा दंड

पश्चिम मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनाकारण साखळी खेचल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याशिवाय आता साखळी खेचल्यानंतर ट्रेन जितके मिनिटे थांबेल, तितक्या मिनिटांचाही खर्च वसूल केला जाणार आहे. हा दंड प्रतिमिनीट ८,००० रुपये इतका असेल. उदाहरणार्थ- जर ट्रेन पाच मिनिटांसाठी थांबली, तर प्रवाशाकडून ५०० + ८,००० = ४०,५०० रुपये आकारले जातील. त्यामध्ये ५०० रुपये दंड आणि ४० हजार रुपये डिटेंशन चार्ज (प्रतिमिनीटप्रमाणे) भरावा लागणार आहे. म्हणजे ट्रेन १० मिनिटे थांबली, तर दंडाची रक्कम ८०,५०० रुपयांपर्यंत वाढू शकते.

लग्न राहिलं बाजूला पाहुण्यांची डोसा खाण्यासाठी तोबा गर्दी! काउंटरवर पडले तुटून, बनवणाऱ्यालाही फुटला घाम, पाहा VIDEO

याविषयी भोपाळ रेल्वे विभागाचे व्यवस्थापक देवाशीष त्रिपाठी यांनी सांगितले की, पश्चिम-मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागात ६ डिसेंबरपासून हा नियम लागू करण्यात येत आहे. कारण- गेल्या तीन महिन्यांत भोपाळ रेल्वे विभागात साखळी खेचण्याच्या जवळपास १२६२ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे.

अलार्म चेन पुलिंग ‘या’ दोन कारणांसाठी असेल वैध

भोपाळ रेल्वे विभागाच्या नियमानुसार, ‘अलार्म चेन पुलिंग’ केवळ दोन विशेष परिस्थितीत वैध मानले जाईल. प्रथम म्हणजे ट्रेनमध्ये चढता-उतरताना किंवा इतर कोणत्या कारणामुळे प्रवाशाचा जीव धोक्यात असल्यास म्हणजे अपघात होण्यापासून वाचवण्यास. आणि दुसरे कारण म्हणजे १० वर्षांपेक्षा कमी आणि ६० वर्षांवरील व्यक्ती चढताना ट्रेन सुरू झाल्याने प्लॅटफॉर्मवरच राहिली तर. त्याशिवाय इतर सर्व कारणे बेकायदा मानली जातील,

अशा प्रकरणांमध्ये रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये एकूण दोन लाख ९० हजार ७७५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चेन पुलिंगच्या वेळी अनेक प्रवासी ट्रेनमधून खाली उतरतात आणि पळून जाऊ लागतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways chain pulling without reason will be costly fine of 8000 rupees per minute will be imposed sjr