‘यात्रीगण कृपया ध्यान दे…’ हा आवाज रेल्वे स्थानकांवर प्रत्येकाने ऐकला असेल. या आवाज कोणाचा आहे असा प्रश्न अनेकवेळा आपल्याला पडतो. प्रत्येक स्थानकावर लाउड स्पीकरवर ऐकू येणारा हा आवाज वेगवेगळ्या व्यक्तींचा असतो की एकाच व्यक्तीचा असाही प्रश्न आपल्याला पडतो. हा आवाज देशातील सर्व स्थानकांवर एकच असतो की वेगवेगळा? हा आवाज कोणाचा आहे? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘यात्रीगण कृपया ध्यान दे…’ रेल्वे स्थानकांवर ऐकू येणारा हा आवाज सरला चौधरी यांचा आहे. १९८२ साली सरला चौधरी यांच्यासह हजारो उमेदवारांनी रेल्वेमध्ये उद्घोषक पदासाठी परीक्षा दिली होती. त्यापैकी सरला चौधरी यांची निवड झाली. सरला यांची निवड तात्पुरत्या काळासाठी करण्यात आली होती.

आणखी वाचा: अंधारातही डास आपल्याला कसे शोधतात? जाणून घ्या यामागचं कारण

जेव्हा सरला यांच्या आवाजाने प्रवासी सूचनांकडे लक्ष देऊ लागले, त्यांच्या आवाजाचा प्रवाशांवर प्रभाव पडत असल्याचे रेल्वेला जाणवले तेव्हा सरला यांना या पदासाठी १९८६ साली कायमस्वरूपी रुजू करण्यात आले. आजही देशातील अनेक रेल्वे स्थानकांवर सरला यांच्या प्री रेकॉर्डिंगचा वापर केला जातो आणि जर ट्रेनचे नाव नवे, वेगळे असेल तर तिथे दुसऱ्या व्यक्तीचा आवाज वापरला जातो. सरला चौधरी आता अनाउन्सर पदावर नसल्या तरी त्यांचा आवाज आजही प्रवाशांना सूचना देण्याचे काम करत आहे.

असे करण्यात आले रेकॉर्डिंग:
१९८६ साली जेव्हा सरला कायमस्वरूपी रुजु झाल्या. तेव्हा सुरूवातीला त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. त्यावेळी प्रत्येक रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांना उद्घोषणा म्हणजेच अनाउन्समेंट कराव्या लागत तसेच त्याचे रेकॉर्डिंगही करावे लागत असे. या अनाउन्समेंट वेगवेगळ्या भाषेतही रेकॉर्ड कराव्या लागत असत. नंतर रेल्वेने याची जबाबदारी ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीमकडे दिली.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers may have attention please announcement on railway station this sound is of sarla chaudhary pns