गाढ झोपेत असताना डास चावल्याने आपली झोपमोड होते, तेव्हा आपली फार चिडचिड होते. अंधारात डासांना आपण कुठे आहोत ते कसे समजते? डासांना अंधारात दिसतं का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण यामागचं नेमकं कारणं फार कमी जणांना माहित असते. अंधारातही डासांना आपण कुठे आहोत ते कसे समजते जाणून घ्या.

आपण कुठे आहोत हे आपल्यामुळेच डासांना समजते. आपण श्वास सोडताना जो कार्बन डायऑक्साईड सोडतो तो याला कारणीभूत ठरतो. या कार्बन डायऑक्साईड आणि शरीराच्या वासामुळे डासांना आपण कुठे आहोत ते लगेच समजते.

summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

आणखी वाचा: सफरचंद, बटाटे कापल्यानंतर काळे का पडतात? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण

अशाप्रकारे रात्रीच्या अंधारातही डासांना आपण कुठे आहोत ते समजते आणि ते आपली झोपमोड करतात. यासह डासांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ मादी डासच आपल्याला चावते. नर डास कधीही चावत नाही. शरीराचा वास, शरीरातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड यासह शरीराला येणाऱ्या घामाच्या वासावरून मादी डासांना आपण कुठे आहोत ते समजते.