काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये शुक्रवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये युवा, रोजगार, मजूर, महिलांना १ लाखांची मदत, शिक्षण, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासह ३० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. मात्र भाजपाकडून काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करण्यात आली. यामध्ये न्यूयॉर्क आणि थायलंड देशातील फोटो छापण्यात आले आहेत, यावरून काँग्रेस किती गंभीर आहे, हे दिसून येते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, “मध्यंतरी काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख म्हणाल्या की, त्यांचे सोशल मीडिया कोण हाताळते? हे त्यांना माहीत नाही. पण पक्षाचा जाहीरनामा कोण तयार करते, हे तरी पक्षाला माहीत असावे ना. जाहीरनाम्यात पर्यावरण विभागात जे फोटो छापले गेले आहेत, ते राहुल गांधींच्या आवडत्या देशाचे आहे. थायलंड हा देश राहुल गांधींचा आवडता देश आहे.”

३० लाख युवकांना नोकरी, महिलांना वर्षाला १ लाख ते शेतीमालाला हमीभाव; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा

“काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, काँग्रेसला जेव्हा स्वातंत्र्यानंतर सत्ता मिळाली होती, तेव्हा देशात सुईचेही उत्पादन होत नव्हते. पण त्यांचे विधान असत्य आहे. सीव्ही रामण यांना १९३० साली नोबल पारितोषिक मिळाले होते. भारतीय विज्ञान संस्थेची (बंगळुरू) १९०९ साली स्थापन करण्यात आली होती. पण तरी नेहरूंच्या आगमनानंतरच देशात सर्वकाही सुधारणा झाली, असे काँग्रेसचे म्हणणे आहे”, असाही आरोप त्रिवेदी यांनी केला.

त्रिवेदी पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात चुकीचे फोटो वापरले गेले, हा मोठा विषय नाही. पण ते फोटो विदेशातले आहेत, हा चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत काँग्रेस नेते विदेशात जाऊन भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करत होते. पण आता तर ते विदेशातले फोटो आणि त्यांचा जाहीरनामाच उचलत आहेत.

पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी इच्छुक?

काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत, ती त्यांनी स्वतःच्या शासन काळात कधीच पूर्ण केलेली नाहीत. मग त्यांचे सरकार केंद्रात असो किंवा कोणत्याही राज्यात असो…, अशीही टीका त्रिवेदी यांनी केली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress manifesto has photos of new york and thailand allegation by bjp kvg