Ahmednagar Lok Sabha Election 2024 Results : अठराव्या लोकसभेचे धक्कादायक असे निकाल समोर येत आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे अनेकांचे लक्ष होते. विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने आमदार निलेश लंके यांना मैदानात उतरवले होते. निलेश लंके यांचा या निवडणुकीत पराभव होईल, अशी टीका भाजपा आणि अजित पवार गटाने केली होती. मात्र निकालात आता आश्चर्यकारक पद्धतीने निलेश लंके पुढे गेले आहेत. दुपारी चार वाजता निलेश लंके यांनी ६,८२४ मतांची आघाडी घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निलेश लंके यांना २,४९,७३६ मते आतापर्यंत मिळाली आहेत. तर सुजय विखे पाटील यांना २,४२,९१२ मते मिळाली आहेत. मतमोजणीच्या आणखी काही फेऱ्या बाकी आहेत. या फेऱ्यात चित्र बदलूही शकते. पण ज्यापद्धतीने निलेश लंके यांनी कडवी टक्कर दिली, ते पाहता भाजपाला इथे विजय मिळवणे, अवघड झाल्याचे दिसते.

बारामतीत अजित पवार गटाला धक्का; सुप्रिया सुळे यांचा एक लाख मतांनी दणदणीत विजय

भाजपाला महाराष्ट्रात जोरदार फटका बसताना दिसत आहे. नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित, अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा, रामटेकमध्ये सुनील मेंढे, चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार, सोलापूरमध्ये राम सातपुते यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ जागांपैकी २३ जागांवर भाजपा, १८ जागांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ५, काँग्रेस- १ आणि एमआयएमने एका जागेवर विजय मिळवला होता. भाजपाने २५ जागांवर निवडणूक लढविली होती. त्यापैकी बारामतीमध्ये कांचन कूल आणि चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता.

निकालांबाबत शरद पवार नितीश कुमारांशी नव्हे, ‘या’ दोन नेत्यांशी बोलले; स्वत: माहिती देताना म्हणाले…

२०२४ च्या निवडणुकीत भाजपाने मागच्यावेळेपेक्षा अधिक जागा स्वतःकडे घेतल्या आहेत. यावेळी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) असे दोन घटक पक्ष असतानाही २८ जागा मिळविण्यात यश मिळविले आहे. यावेळी भाजपाने अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर आणि सातारा हे शिवसेनेचे चार मतदारसंघ स्वतःकडे वळविण्यात यश मिळविले आहे. तर भाजपाच्या कोट्यातला बारामती मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election result 2024 ahmednagar seat results nilesh lanke nilesh lanke lead over sujay vikhe patil kvg