नरेंद्र मोदींनी आज संध्याकाळी ७.१५ वाजता देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत. तर भाजपासह एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत. या बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. या शपथविधीत काही जणांचा पत्ता कट झाला आहे तर काही जणांना नव्याने संधी देण्यात आली आहे. अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळालेलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत, सुप्रिया सुळेंचा टोला

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या आघाडीकडे बहुमत आहे. पहिल्यांदाच असा आघाडीच्या सरकारचे ते नेते आहेत त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून चांगलं काम करावं अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांना यावेळी अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद का दिलं गेलं नाही? याबाबत विचारलं असता त्यावरही त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

हे पण वाचा- Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : दम बिर्याणी ते बाजरीची खिचडी, शपथविधीनंतर जेपी नड्डांच्या घरी स्नेहभोजन, नवनिर्वाचित मंत्र्यांसाठी खास मेन्यू

अजित पवार गटाला आणि भाजपाला टोला

नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी शरद पवारांनाही निमंत्रण आलं होतं. मलाही फोन आला होता, मात्र आज संघटनात्मक बैठक होती आणि उद्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी आणि शरद पवार उपस्थित राहणार नाही असं कळवलं होतं. अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही हे अपेक्षित होतं. मित्र पक्षांशी भाजपा कशी वागते हे मी दहा वर्षे जवळून पाहिलं आहे. मला दुसऱ्यांच्या घरात ढवळाढवळ करायला आवडत नाही. पण यात नवल वाटण्याचं काहीही कारण नाही. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवार आणि नरेंद्र मोदींना टोलाच लगावला आहे.

हे पण वाचा- PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : राष्ट्रवादीला नकार, पण केवळ एक खासदार असलेल्या जीतन मांझींना कॅबिनेट मंत्रीपद

अजित पवारांबरोबर गेले आमदार परत येणार का?

अजित पवारांबरोबर गेलेले आमदार परत येणार आहेत का? असं विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या माझ्या पोटात बऱ्याच गोष्टी राहतात त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. काही गोष्टी घडायच्या असतील तर आमची वर्किंग कमिटी निर्णय घेईल. शरद पवार आणि वर्किंग कमिटी ठरवेल की कुणी परत यायची इच्छा दर्शवली तर कुणाला घ्यायचं असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

फोडाफोडीच्या राजकारणात सत्ताधारी गुंतलेत, त्यांना

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्याच्या खासदारांना जर मंत्रीपद मिळत असेल तर चांगला निर्णय आहे. मात्र ज्या प्रकारे घटना पुण्यात घडत आहेत त्यावर काहीतरी ॲक्शन घेणे गरजेचे आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं. त्या ओळखीला काळीमा फासण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं आहे. ड्रग्स असेल ड्रंक अँड ड्राईव्ह असेल अशा अनेक घटना घडत आहेत. पाऊस पडला आहे पाणी तुंबलं आहे त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. अडीच वर्षे झाले महापालिका निवडणुका नाहीत. हे खोके सरकार फक्त फोडाफोडीच्या राजकारणात व्यग्र आहे. प्रशासकीय कामांमध्ये सत्ताधाऱ्यांना लक्ष द्यायला वेळच नाही असाही टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp supriya sule reaction about ajit pawar group ncp does not have a single ministerial position scj