काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. पित्रोदांच्या वक्तव्यामुळे भाजपासह एनडीएतील सर्व घटकपक्ष काँग्रेसला लक्ष्य करू लागले आहेत. सॅम पित्रोदा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना वारसा करासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून यात याता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील उडी घेतली आहे. मोदी यांनी पित्रोदांचा नामोल्लेख टाळत केवळ त्यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदी म्हणाले, शाही परिवारातील (गांधी कुटुंब) राजकुमाराच्या सल्लागारांनी (सॅम पित्रोदा) एक वक्तव्य केलं होतं. हे सल्लागार राजकुमाराच्या वडिलांबरोबरही काम करत होते. ते कुटुंब नेहमी या सल्लागाराचे सल्ले ऐकतो. ते सल्लागार म्हणाले आपल्या देशातील मध्यमवर्गीय लोक मेहनत करून पैसे कमावतात त्या पैशावर अधिक कर लावायला हवा. आता हे लोक त्याहून एक पाऊल पुढे गेले आहेत. त्यांच म्हणणं आहे की ते आता देशात वारसा कर लावतील. म्हणजेच आई-वडिलांकडून मिळणाऱ्या वारशावरही ते कर लावतील. याचा अर्थ तुम्ही मेहनत करून जी संपत्ती जमवता, ती संपत्ती किंवा ते पैसे तुमच्या मुलांना मिळणार नाहीत. कारण काँग्रेस सरकारचा पंजा ते पसे तुमच्याकडून हिसकावेल.

पंतप्रधान मोदी म्हणाले, या काँग्रेस पक्षाचा एक मंत्र आहे. काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. म्हणजे तुम्ही जीवंत आहात तोवर काँग्रेस तुमच्यावर जास्तीत जास्त कर लावून तुम्हाला मारून टाकेल आणि तुम्ही जीवंत नसाल तेव्हा तुमच्या मुलांवर वारसा कराचा ओझं टाकेल. ज्यांनी आपला संपूर्ण पक्ष पित्रूसंपत्ती म्हणून आपल्या मुलांना दिला आहे तेच लोक तुमची संपत्ती तुमच्या मुलांना देण्यापासून रोखण्याच्या विचारात आहेत. तुम्ही मेहनतीने कमावलेले पैसे तुमच्या मुलांना मिळू नये असं त्यांना (काँग्रेस) वाटतं.

हे ही वाचा >> “रॉबर्ट वाड्रा अब की बार”, राहुल गांधींच्या उमेदवारीवरील सस्पेन्सदरम्यान अमेठीत पोस्टर्स; इराणी म्हणाल्या, दाजींची नजर…

पित्रोदा काय म्हणाले होते?

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बोलताना सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील एका कराचा उल्लेख केला होता. “अमेरिकेत वारसा कर नावाचा एक कर आहे. एखाद्या व्यक्तीने १०० मिलियन डॉलर्स मूल्याइतकी संपत्ती कमावली असेल, तर त्याच्या निधनानंतर त्याच्या मुलांना साधारणपणे ४५ टक्के संपत्ती मिळते आणि उर्वरीत ५५ टक्के संपत्ती सरकार ताब्यात घेतं. हा एक वेगळा कायदा आहे. या कायद्यानुसार, तुम्ही तुमच्या हयातीत कमावलेली संपत्ती निधनानंतर जनतेसाठी सोडून दिली पाहिजे. सर्व संपत्ती नाही, परंतु, किमान निम्मी संपत्ती द्यायला हवी आणि मला हे न्याय्य वाटतं.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi on inheritance tax congress will rob you whether you are dead or alive asc