Uttarakhand, Goa, Manipur, Punjab Assembly Election Live Updates: पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपासोबत हातमिळवणी केली. तर, आम आदमी पक्षाने पंजाबमधील निडवणूक चुरशीची केली होती. त्यामुळे आपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, गोवा, उत्तराखंड व मणिपूर या तीनही राज्यांमध्ये काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्यासाठी चढाओढ असेल. एग्झिट पोलमध्ये उत्तराखंड व गोवा या दोन राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही.

Live Updates

Assembly Election 2022 Results Live News Updates : पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये कोणते पक्ष सत्ता स्थापन करतील हे पाहणं महत्वाचं असेल.

10:39 (IST) 10 Mar 2022
गोव्यात भाजपाची १८ आणि काँग्रेसची १२ जागांवर आघाडी

गोव्यातील सर्व ४० जागांसाठी अधिकृत कल समोर आले आहेत. त्यानुसार, भाजपा १८, काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. तर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांकेलीममध्ये ३०० मतांनी आघाडीवर आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

10:23 (IST) 10 Mar 2022
मणिपूरमध्ये भाजपा १२ जागांवर आघाडीवर

मणिपूरमध्ये भाजपा १२ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ५, जदयू ४ जागांवर आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग हेनगांग या त्यांच्या मतदारसंघात आघाडीवर आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

10:19 (IST) 10 Mar 2022
गोव्यात भाजपा आघाडीवर, तर काँग्रेस पिछाडीवर

सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, गोव्यात सध्या भाजपा १७ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस १३ , महाराष्ट्रवादी गोमंतक-५, आम आदमी पार्टी एका जागेवर आघाडीवर आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

10:13 (IST) 10 Mar 2022
पंजाबमधील निकाल सकारात्मक येतील अशी आशा – आप नेते गोपाल राय

पंजाबमध्ये सकारात्मक ट्रेंड आहेत, निकाल देखील सकारात्मक येतील अशी आशा आहे. परिवर्तनासाठी मतदान केल्याबद्दल मी पंजाबच्या जनतेचे आभार मानतो, असं दिल्लीचे मंत्री आणि आप नेते गोपाल राय यांनी म्हटलंय.

https://platform.twitter.com/widgets.js

10:11 (IST) 10 Mar 2022
गोवा आणि पंजाबमध्ये निकालांचे अंदाज बांधणं कठीण – संजय राऊत

दोन वाजेपर्यंत निकालांचं पुर्ण चित्र स्पष्ट होईल. छोट्या राज्यांचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होतील. गोवा आणि पंजाबमधील निकालाबद्दल आत्ता सांगणे योग्य ठरणार नाही. तर, उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव भाजपाला चांगली टक्कर देत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

10:04 (IST) 10 Mar 2022
मणिपूरमध्ये भाजपा ६ जागांवर आघाडीवर

मणिपूरमध्ये भाजपा ६ जागांवर आघाडीवर असून JD(U) २, तर कॉंग्रेस १ जाागेवर आघाडीवर आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

10:02 (IST) 10 Mar 2022
पंजाबमध्ये आप कार्यकर्त्यांचा जल्लोष

पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने बहुमताचा आकडा पार केल्यामुळे आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांच्या संगरूर येथील निवासस्थानी कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

10:00 (IST) 10 Mar 2022
उत्तराखंडमध्ये भाजपा आणि काँग्रेसचे मोठे नेते पिछाडीवर

खतिमा आणि लालकुआ मतदारसंघातून भाजपाचे पुष्कर सिंग धामी आणि काँग्रेसचे हरीश रावत पिछाडीवर आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

09:58 (IST) 10 Mar 2022
गोव्यात काँग्रेस आघाडीवर, तर भाजपा पिछाडीवर

काँग्रेस आता १५ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप १३ जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्या मतदारसंघात, सांकेलीममध्ये पिछाडीवर आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

09:50 (IST) 10 Mar 2022
पंजाबमध्ये काँग्रेसची जागा आप घेणार, राघव चढ्ढांनी व्यक्त केला विश्वास

आपण सर्वसामान्य नागरिक (आम आदमी) आहोत, पण जेव्हा 'आम आदमी' जागा होतो ना, तेव्हा सिंहासन हादरते. आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे, आम आदमी पार्टी आणखी एक राज्य जिंकत आहे असून ती राष्ट्रीय शक्ती बनली आहे, असं आपचे पंजाब सह-प्रभारी राघव चढ्ढा म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

09:42 (IST) 10 Mar 2022
पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग पिछाडीवर

पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग पिछाडीवर असल्याचं वृत्त आहे.

09:30 (IST) 10 Mar 2022
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवर

गोव्याच्या सांकेलीममधून मुख्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार प्रमोद सावंत ४००मतांनी पिछाडीवर असून इथे काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

09:28 (IST) 10 Mar 2022
भाजपा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

“मी देवाला प्रार्थना केली आहे की, येणारी पाच वर्षे गेल्या ५ वर्षांसारखीचं शांतता आणि विकासाची असतील. भाजपा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल,” असा विश्वास मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी व्यक्त केला.

09:26 (IST) 10 Mar 2022
…तर काँग्रेसमध्ये स्फोट होतील – योगेंद्र यादव

“पंजाबमध्ये काँग्रेस हरली तर पक्षात स्फोट होतील. काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून २०२४ लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर काँग्रेसची ही अवस्था आणि समोर दुसऱ्या समर्थ आघाडीचा अभाव ही भाजपासाठी अत्यंत सुयोग्य स्थिती असेल,” असं योगेंद्र यादव म्हणाले.

09:22 (IST) 10 Mar 2022
मणिपूरमध्ये दोन जागांवर भाजपाची आघाडी

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मणिपूरमध्ये भारतीय जनता पार्टी दोन जागांवर आघाडीवर आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

09:19 (IST) 10 Mar 2022
गोव्यात ४ जागांवर भाजपा आघाडीवर

निवडणूक आयोगानुसार पणजी, अल्दोना आणि इतर २ विधानसभा मतदारसंघात भाजपा आघाडीवर आहे. तर दाबोलीम आणि अन्य एका जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

09:18 (IST) 10 Mar 2022
अमृतसर पूर्वमधून नवज्योत सिंग सिद्धू पिछाडीवर

अमृतसर पूर्वमधून काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू पिछाडीवर आहेत.

09:16 (IST) 10 Mar 2022
मणिपूरच्या हिरोकमध्ये भाजपा आघाडीवर

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मणिपूरच्या हिरोक विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

09:11 (IST) 10 Mar 2022
…तर आम्हाला आत्मपरीक्षण करावं लागेल – अभिषेक मनू सिंघवी

पाचही राज्यांमध्ये काँग्रेस हरली तर आम्हाला आत्मपरीक्षण करावं लागेल, पक्षाची पुनर्रचना सर्व स्तरांवर करावी लागेल, असंही काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

09:10 (IST) 10 Mar 2022
उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करू, काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवींचा दावा

“उत्तराखंड व गोव्यामध्ये आम्ही चांगली कामगिरी करू, तर उत्तराखंडमध्ये आम्ही सरकार स्थापन करू. गोव्यात त्रिशंकू स्थिती असू शकते,” असं एनडीटीव्हीशी बोलताना काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.

09:07 (IST) 10 Mar 2022
गोव्यात उत्पल पर्रिकर पिछाडीवर

पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे उत्पल पर्रिकर सध्या पिछाडीवर असून भाजपा उमेदवार बाबूश मॉन्सेरात आघाडीवर आहेत.

08:56 (IST) 10 Mar 2022
पंजाबच्या मु्ख्यमंत्र्यांनी कुटुंबासह चमकौर साहिब गुरुद्वारामध्ये केली प्रार्थना

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी आपल्या कुटुंबासह चमकौर साहिब गुरुद्वारामध्ये प्रार्थना केली.

https://platform.twitter.com/widgets.js

08:45 (IST) 10 Mar 2022
पंजाबमधील मुकेरियन मतदारसंघात अकाली दल आघाडीवर

निवडणूक आयोगानुसार, सुरुवातीच्या कलांमध्ये शिरोमणी अकाली दल पंजाबमधील मुकेरियन विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

08:42 (IST) 10 Mar 2022
मणिपूूरच्या मुख्यमंत्र्यांनी श्री गोविंदाजी मंदिरात केली प्रार्थना

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी इंफाळमधील श्री गोविंदाजी मंदिरात प्रार्थना केली.

https://platform.twitter.com/widgets.js

08:41 (IST) 10 Mar 2022
मणिपूरमध्ये काँग्रेसची आघाडी

आतापर्यंतच्या कलांनुसार मणिपूरमध्ये ४ जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.

08:39 (IST) 10 Mar 2022
पंजाबमध्ये आपची आघाडी

पंजाबमध्ये आतापर्यंतच्या कलांनुसार ३४ जागांवर आम आदमी पक्ष आघाडीवर आहे.

08:32 (IST) 10 Mar 2022
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्त मंदिरात केली प्रार्थना

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री दत्त मंदिरात प्रार्थना केली. गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू झाली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

08:24 (IST) 10 Mar 2022
पंजाबमध्ये आप आघाडीवर, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर

पंजाबमध्ये आप आघाडीवर १५ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे.

08:23 (IST) 10 Mar 2022
गोव्याचा पहिला कल भाजपाच्या बाजूने

गोव्यात पहिला कल हाती आला असून हा कल भाजपाच्या बाजूने आहे.

08:21 (IST) 10 Mar 2022
गुरुदासपूर येथील मतमोजणी केंद्रात पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू

पंजाबमधील गुरुदासपूर येथील मतमोजणी केंद्रात पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

गोव्यातील एका मतमोजणी केंद्रावरचं दृश्य (फोटो ANI)

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोवा, उत्तराखंड व मणिपूर या तीनही राज्यांमध्ये काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्यासाठी चढाओढ असेल. एग्झिट पोलमध्ये उत्तराखंड व गोवा या दोन राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे काँग्रेसने गेल्या वेळी झालेला गलथानपणा टाळण्याची दक्षता घेतली आहे. २०१७ मध्ये गोव्यात काँग्रेसला सर्वाधिक १७ जागा असतानाही तिथे भाजप सरकार बनवण्यात यशस्वी झाला होता. मणिपूरमध्येही भाजपने सत्ता स्थापनेत काँग्रेसवर मात केली होती.