कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे, अशा मतदारसंघात आता लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पदफेरीत राजारामपूरी, शाहूपूरी व्यापारी पेठ एकवटली

कोल्हापूर जिल्हयातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात पार पडणार असून, कोल्हापूर लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महायुतीचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा २८ एप्रिल रोजी तपोवन मैदान, कोल्हापूर येथे होणार आहे, ही माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. या सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकार मधील इतर मंत्री उपस्थित राहणार आहे. त्यामुळे दि.२८ रोजी कोल्हापुरात महायुतीचे भगवे वादळ घोंगावणार असल्याचे सांगितले.