India vs UAE Asia Cup 2025 Highlights: भारतीय संघाने आशिया चषक अभियानाची सुरुवात दणदणीत विजयाने केली. कुलदीप यादव, शिवम दुबे जोडीच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर भारतीय संघाने युएईचा डाव ५७ धावांतच गुंडाळला. अभिषेक शर्माच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाने हे लक्ष्य ४.३ षटकातच गाठलं. खणखणीत विजयासह भारतीय संघाने पाकिस्तानच्या आव्हानासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. भारतीय संघाने संजू सॅमसनवर विश्वास ठेवत त्याला संघात कायम राखलं मात्र त्याची फलंदाजीची भूमिका बदलली आहे. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा ही मित्रांची जोडी सलामीला येईल हे पक्कं झालं आहे. अतिशय उष्ण आणि आर्द्र वातावरणात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरला.

Match Ended

Asia Cup, 2025


India 
60/1 (4.3)

vs

United Arab Emirates  
57 (13.1)

Match Ended ( Day – Match 2 )
India beat United Arab Emirates by 9 wickets

Live Updates

India vs UAE Asia Cup Match Highlights: आशिया चषक २०२५ भारत वि. युएई सामन्याचे हायलाईट्स

22:12 (IST) 10 Sep 2025
IND vs UAE Live: भारताचा ५ षटकांत सहज विजय

भारतीय संघाने अवघ्या ५ षटकांच्या आता ५८ धावांचं लक्ष्य गाठत मोठा विजय मिळवला. भारताने शिवम दुबे आणि कुलदीप यादवच्या गोलंदाजीच्या बळावर युएईला ५७ धावांवर सर्वबाद केलं. यानंतर फलंदाजीत अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने वादळी सुरूवात करून दिली. यासह भारताने ४.३ षटकांतच ५८ धावांचं लक्ष्य गाठत विजय निश्चित केला.

21:15 (IST) 10 Sep 2025
IND vs UAE Live: युएईचा संघ ऑलआऊट

युएईचा संघ अवघ्या ५७ धावांवर सर्वबाद झाला आहे. युएईने सुरूवात चांगली केली पण भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजी आक्रमणापुढे फलंदाज अपयशी ठरले. शिवम दुबेने नववी तर कुलदीप यादवने १०वी विकेट घेतली. या सामन्यात कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतले. शिवम दुबेने ३ विकेट्स घेतले. तर बुमराह, अक्षर आणि वरूण यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

21:06 (IST) 10 Sep 2025

IND vs UAE Live: अक्षर पटेल स्ट्राईक

अक्षर पटेलने १२व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सिमरनजीत सिंगला पायचीत करत सातवी विकेट मिळवून दिली आहे. तर शिवम दुबेने १३व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ध्रुव पराशरला पायचीत केलं.

21:06 (IST) 10 Sep 2025

IND vs UAE: शिवम दुबेच्या खात्यात विकेट

शिवम दुबेला युएईविरूद्ध सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली. शिवम दुबेने असिफ खानला कसोटी क्रिकेटप्रमाणे झेलबाद केलं. संजू सॅमसनने कमालीचा झेल टिपला आहे.

20:19 (IST) 10 Sep 2025
IND vs UAE: बुमराह-वरूणने भारताचं विकेटचं खातं उघडलं

जसप्रीत बुमराहने पॉवरप्लेमधील चौथ्या षटकात अलीशान शरीफु याला कमालीचा यॉर्कर टाकत क्लीन बोल्ड केलं आणि भारताला पहिली विकेट मिळवून दिली आहे. शरीफु २२ धावा करत माघारी परतला. यासह युएईने २६ धावांवर पहिली विकेट गमावली. पुढच्या षटकात मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीने भारताला दुसरी विकेट मिळवून दिली आहे.

20:18 (IST) 10 Sep 2025

IND vs UAE: युएईच्या शराफुची शानदार फटकेबाजी

भारताकडून आतापर्यंत हार्दिक पंड्या, बुमराह आणि अक्षर पटेलने गोलंदाजी केली. तिघांच्या गोलंदाजीवर सलामीवीर अलीशान शरीफुने उत्कृष्ट फलंदाजी करत १६ चेंडूत २५ धावा केल्या आहेत.

19:50 (IST) 10 Sep 2025

IND vs UAE: युएईची प्लेईंग इलेव्हन

मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दिकी, सिमरनजीत सिंग

19:49 (IST) 10 Sep 2025

IND vs UAE: भारताची प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती

19:48 (IST) 10 Sep 2025
IND vs UAE: नाणेफेक

आशिया चषक २०२५ मधील भारत आणि युएई सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १५ सामन्यांमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर भारताने नाणेफेक जिंकली आहे.

19:47 (IST) 10 Sep 2025

IND vs UAE: नाणेफेक

आशिया चषक २०२५ मधील भारत वि. युएई सामन्याची नाणेफेक टीम इंडियाने जिंकली असून संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:58 (IST) 10 Sep 2025

IND vs UAE: कोण आहेत युएईचे कोच?

कोण आहेत युएईचे कोच लालचंद राजपूत? भारताच्या २००७ T20 WC विजेत्या संघासह मुंबई इंडियन्स, झिम्बाब्वेचे होते कोच

18:09 (IST) 10 Sep 2025

IND vs UAE: ९ वर्षानी आशिया चषक खेळणार युएईचा संघ

युएईचा संघ ९ वर्षांनी आशिया चषक खेळणार आहे. यानंतर आता 2024 ACC Premier Cup जिंकून युएईने २०२५ आशिया चषकासाठी पात्रता मिळवली आहे.

युएई सघ कधीकधी आशिया चषक खेळला?

१९९६ – आशिया चषक (शारजाह, युएई) – पहिल्यांदा युएई सहभागी

२००४-आशिया चषक (श्रीलंका)

२००८ आशिया चषक (पाकिस्तान)

२०१६ आशिया चषक (बांगलादेश, टी-२० फॉरमॅट) – क्वालिफायर जिंकून युएई मुख्य स्पर्धेत पोहोचला.

17:33 (IST) 10 Sep 2025

IND vs UAE: हवामानाचा अंदाज

दुबईतील तापमान ४२ डिग्रीच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सामन्यावेळी तापमान ३६ डिग्रीच्या आसपास असेल. त्यामुळे खेळाडूंसह प्रेक्षकांनाही गरमीमुळे त्रास होऊ शकतो. दुबईमधील तापमानामुळे स्पर्धेची वेळ अर्धा तास पुढे ढकलण्याता आली. दरम्यान नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

17:32 (IST) 10 Sep 2025

IND vs UAE: भारत विरूद्ध यूएई पिच रिपोर्ट

भारत वि. युएई सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. याआधी झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत फिरकी गोलंदाजांना चांगलीच मदत मिळाली होती. मात्र, यावेळी खेळपट्टीवर गवताचं प्रमाण अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळू शकते.

17:30 (IST) 10 Sep 2025
IND vs UAE: आशिया चषकातील भारताचा पहिला सामना

भारतीय संघ युएईविरूद्धच्या सामन्याने आशिया चषक मोहिमेला सुरूवात करत आहे. टीम इंडिया प्रथमच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली आशिया चषक खेळणार आहे. गतविजेता भारतीय संघ यंदाही जेतेपद जिंकण्यासाठी फेव्हरेट संघ आहे.

IND vs UAE Highlights in marathi: भारताने ५ षटकांच्या आत ८ धावांचं  लक्ष्य गाठत युएईचा दारूण पराभव केला आणि आशिया चषक मोहिमेला दणक्यात सुरूवात केली.