श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या खूश आहे. हार्दिक म्हणाला की रोहितच्या पुनरागमनामुळे त्याला आराम करण्याची आणि एक खेळाडू म्हणून त्याच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताला २-१ ने विजय मिळवून दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दिकने श्रीलंका विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी प्रसारकांना सांगितले की, “रो (रोहित शर्मा) परत आला आहे त्यामुळे मी खूपच निवांत आहे. मी माझ्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो आणि माझे ज्ञान, माझ्या कल्पना शेअर करू शकतो. त्यांना माझी मदत किंवा सल्ल्याची आवश्यकता असल्यास, मी नेहमीच तिथे असतो. माझे आरोग्य खूप चांगले आहे, आम्ही एका योजनेचे अनुसरण करत आहोत आणि फक्त ६-७ महिने दूर असलेल्या विश्वचषकासाठी कामाचा ताण योग्यरित्या नियोजित करून दूर केला जात आहे.”

हेही वाचा: PAK vs NZ: ‘अंपायरला असा चेंडू लागला की…’, त्यानंतर रागाच्या भरात त्याने जे काही केले ते पाहाच, Video व्हायरल

हार्दिकने खुलासा केला की त्याने अक्षर पटेलला फलंदाजीमध्ये अधिक योगदान देण्याची विनंती केली होती आणि त्या अष्टपैलूने आपली फलंदाजी सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली. हार्दिक पुढे म्हणाला की, “त्यामुळे खूप फरक पडला आहे, मी फक्त त्याच्याकडे एकच विनंती केली होती ती म्हणजे त्याच्या फलंदाजीतील अधिक योगदान. त्याने जबरदस्त काम केले आहे, अक्षर माझ्यानंतर आहे हे जाणून मला खेळताना कोणतेही दडपण येत नाही, त्याने संघाला एक विशिष्ट संतुलन राखण्यास मदत केली आहे. त्याने आपल्या खेळात मोठ्या प्रमाणात चांगला बदल केला आहे. अलीकडच्या काळात संघाला अधिक आत्मविश्वास वाटतो.”

हेही वाचा: IND vs SL 2nd ODI: “कधी कधी टॉस हारणे…” दुसऱ्या सामन्याआधी कर्णधार रोहित शर्माने केली मिश्किल टिप्पणी

कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे गुरुवारी सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमानांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सध्या श्रीलंका ७ गडी गमावत १५६ धावांवर खेळत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Captaincy of rohit regarding rohits captaincy i hardik pandya makes a big statement about the return of senior players avw