Team India batting order: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. या दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत, भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही आणि केवळ ४०.५ षटकांत १८१ धावांत आटोपला. वेस्ट इंडिजने चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि १० सामन्यांमध्ये पहिला विजय मिळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्यांची उत्तरे टीम इंडियाला वर्ल्डकपपूर्वी शोधावी लागणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात ११५ धावांचा पाठलाग करताना रोहित आणि विराट फलंदाजीला आले नाहीत आणि टीम इंडियाने पाच विकेट्स गमावल्या. अशा परिस्थितीत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन रोहितने सामना संपवला. रोहित आणि विराटशिवाय भारतीय वन डे संघ कमकुवत आहे, हे या दोन सामन्यांवरून स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी टीम इंडियासाठी चौथ्या क्रमांकाची समस्या अजूनही कायम आहे.

हेही वाचा: ENG vs AUS: वॉर्नर-ख्वाजाची दमदार शतकी भागीदारी! पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलिया ड्रायव्हिंग सीटवर, विजयासाठी केवळ २४९ धावांची गरज

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर संधी दिली, मात्र तो एक धाव काढून बाद झाला. सूर्यकुमार यादव मधल्या फळीतही सातत्याने अपयशी ठरत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बट्टने भारताच्या समस्येवर तोडगा काढला आहे. शिखर धवनने भारतीय संघात पुनरागमन करावे, असे त्याचे म्हणणे आहे. त्याने गिलसोबत डावाची सुरुवात केली. रोहित तिसऱ्या क्रमांकावर आणि विराट चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. यानंतर हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि यष्टिरक्षक इशान किशन फलंदाजीला आले. यामुळे टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर मजबूत होईल.

बट्टने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, “स्पष्टपणे मला असे जाणवते आहे की, विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळले नाहीत तर टीम इंडियाचा इतर कुठलाही फलंदाज त्यांच्या अनुपस्थितीत जबाबदारी उचलू शकत नाही. या दोघांची अनुउपस्थिती संघाला स्पष्टपणे जाणवते आहे. यापूर्वी जेव्हा धोनी आणि इतर प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात यायची, तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत सुरेश रैना, गौतम गंभीर किंवा युवराज सिंग फलंदाजीची जबाबदारी सांभाळत असत. पण सध्याचे खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वत:ला प्रस्थापित करू शकलेले नाहीत. त्यामुळे विश्वचषकापूर्वी भारताला हा तिढा सोडवावा लागेल.”

हेही वाचा: Stuart Broad: स्टुअर्ट ब्रॉडने युवराज सिंगच्या सहा षटकारांवर सोडले मौन; म्हणाला, “आज जो मी…”

माजी सलामीवीर बट्ट तो पुढे म्हणाला, “मला वाटते की ज्या पद्धतीने एकदिवसीय सामने खेळले जातात, जर नवीन खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करू शकले नाहीत, तर शिखर धवन आणि शुबमन गिल या जोडीला तुम्ही सलामीला पाठवू शकतात. त्यानंतर कदाचित विराटसोबत रोहित शर्मा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर येऊ शकेल. कोहलीनंतर सूर्यकुमार आणि के.एल. राहुल सारखे इतर खेळाडू असू त्याला साथ द्यायला येऊ शकतात. सध्याच्या भारतीय संघात ३-४ खेळाडू आहेत जे सलामीवीराची भूमिका बजावतात. मात्र, जेव्हा हेच खेळाडू मधल्या फळीत फलंदाजी करतात तेव्हा त्यांची कामगिरी खालावते. त्यात अनेकवेळा बदल झालेले आपण पाहिले आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhawans return rohit 3 and virat play at number 4 pakistani veteran salman butt told the solution to indias problem avw