Ashes 2023, ENG vs AUS: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेतील पाचवा सामना लंडनच्या किंग्स्टन ओव्हलवर खेळवला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला. इंग्लंडने पहिल्या डावात २८३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने २९५ धावा केल्या. इंग्लंडचा दुसरा डाव ३९५ धावांवर संपला असून ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३८४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या १३५/० अशी आहे. ऑस्ट्रेलिया विजयापासून केवळ २४९ धावा दूर आहे. त्याचबरोबर इंग्लंडला विजयासाठी १० विकेट्सची गरज आहे. त्यामुळे कांगारू सध्या ड्रायव्हिंग सीटवर आहेत, असे म्हटले तर वावग ठरणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (नाबाद ५८) आणि उस्मान ख्वाजा (नाबाद ६९) यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या अॅशेस मालिकेच्या चौथ्या दिवशी विजयाच्या संधी मजबूत केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३८४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. रविवारी इंग्लंडचा दुसरा डाव ३९५ धावांवर आटोपला. शेवटचा सामना खेळणारा स्टुअर्ट ब्रॉड आठ धावांवर नाबाद राहिला. एक दिवस अगोदरच त्याने ही कसोटी आपल्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी असेल असे जाहीर केले होते. पावसामुळे चोथ्या दिवसाचा खेळ लवकर संपवण्यात आला. मात्र, असे असूनही सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियाने १३५ धावा केल्या होत्या. त्यांच्या सर्व विकेट्स सुरक्षित असून कांगारूंना आणखी २४९ धावा करायच्या आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. चौथा सामना अनिर्णित राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने अॅशेस ट्रॉफी आधीच राखली आहे. इंग्लंडने उपाहारानंतर मार्क वुडकडे गोलंदाजीची धुरा सोपवली. वॉर्नरने एक धाव करत पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर ख्वाजाने मालिकेतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. जानेवारीमध्ये निवृत्तीचे संकेत देणाऱ्या वॉर्नरने इंग्लंडमध्ये आपल्या अंतिम डावात ९० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पुढच्या षटकात उस्मानने चौकार मारून इंग्लंडच्या जॅक क्रॉलीला मागे टाकले, ज्याने मालिकेत ४८० धावा केल्या होत्या. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने बिनबाद ७५५ धावा केल्या होत्या. त्यानंतरही पाऊस सुरु झाला, चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने आधीच जाहीर केले होते. चौथ्या दिवशी पावसाने शेवटचे सत्र वाया गेले. पाचव्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, जर सामना झाला तर ऑस्ट्रेलियासाठी विजयाचा मार्ग सुकर होईल. पाचव्या दिवशी पावसामुळे एक जरी सत्र रद्द झाले तरीर सामना अनिर्णित राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. चौथ्या दिवशी खेळाच्या शेवटच्या सत्राअखेर पाऊस पडला, मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि पुढे खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे मालिकेतील चौथा सामनाही अनिर्णित राहिला आणि आता पाचवा सामनाही अनिर्णित राहू शकतो. असे झाल्यास ऑस्ट्रेलियन संघ पाच सामन्यांची मालिका २-१ ने जिंकेल. हेही वाचा: Stuart Broad: स्टुअर्ट ब्रॉडने युवराज सिंगच्या सहा षटकारांवर सोडले मौन; म्हणाला, “आज जो मी…” ब्रॉड त्याच्या शेवटच्या सामन्यात नाबाद राहिला तत्पूर्वी, इंग्लंडने नऊ गड्यांच्या मोबदल्यात ३८९ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. सर्वांच्या नजरा स्टुअर्ट ब्रॉडवर होत्या, ज्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर हा सामना आपल्या कारकिर्दीतील शेवटचा असेल असे जाहीर केले. जेव्हा तो क्रीझवर आला तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. त्याने मिचेल स्टार्कच्या चेंडूवर षटकार ठोकला, जो त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा शॉट होता. पाच चेंडूंनंतर टॉड मर्फीने जेम्स अँडरसनला एलबीडब्ल्यू केले. शेवटी ब्रॉड नाबाद राहिला.