IND vs AUS 1st Test: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावस्कर मालिकेपूर्वी तयारी करत असलेला भारतीय क्रिकेट संघ ९ फेब्रुवारीला पहिल्या कसोटी सामन्याच्या आधी नागपुरात दाखल झाला. रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये चेक इन करताना भारतीय परंपरेनुसार, हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या कपाळावर टिळा लावून संघाचे स्वागत केले.याच वेळी उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज यांनी केलेली एक कृती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटपटू आणि वेगवान जोडी उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज यांनी कपाळावर कुंकवाचा टिळा लावून घेण्यास नकार दिला. या दोघांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचे स्वागत हसून स्वीकारले परंतु त्यांच्या कपाळावर टिळा लावू नका असा हाताने इशारा केला. हे दोघेच नाही तर भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हे सुद्धा टिळा लावून घेण्यास नाकारताना दिसले.

हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिघांचीही कानउघाडणी करण्यास सुरुवात केली. तर काहींनी खेळाडूंची बाजू घेत हा श्रद्धेचा भाग आहे आणि श्रद्धा अशी लादता येत नाही असेही म्हंटले आहे.

क्रिकेटपटूंची देवभक्ती

अलीकडेच, भारतीय जनता पक्षाचे लोकसभा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यावर स्वतःचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत गौतम गंभीरने लिहिले की, “ख्वाजा निजामुद्दीन औलिया” त्याचबरोबर त्याने हार्ट इमोजीही टाकला. काही लोकांनी त्याची स्तुती केली तर काहींनी टीका सुद्धा केल्या होत्या.

मागील महिन्यात क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या अपघातानंतर भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी मित्राच्या आरोग्यात सुधारणेची प्रार्थना करण्यासाठी उज्जैनमधील नुकत्याच उद्घाटन झालेल्या महाकाल मंदिराला भेट दिली होती. त्यांनी पहाटे मंदिरात भगवान शंकराच्या भस्म आरतीमध्ये भाग घेतला होता.

हे ही वाचा<< “गोव्यात ११ दिवस पोलिसांनी मला..” फ्रेंच अभिनेत्रीचे गंभीर आरोप; म्हणाली “हा मोदींचा भारत, इथे तर..”

काही दिवसांपूर्वी विराट कोहली सुद्धा पत्नी अनुष्का शर्मा व लेक वामिकासह वृंदावनमध्ये बाबा नीम करोली यांचे आशीर्वाद घेण्यास गेला होता. तर गेल्या महिन्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम वनडेच्या आधी, भारतीय खेळाडू युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 1st test umran malik mohammad siraj brutally trolled after refusing tilak viral video netizens say go to pakistan svs
First published on: 04-02-2023 at 11:12 IST