भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया अजूनही १९१ धावांनी पिछाडीवर आहे. मात्र सामना रोमांचक स्थितीत आला आहे. अहमदाबाद कसोटीचा तिसरा दिवस भारतीय सलामीवीर शुबमन गिल याच्या नावावर राहिला. भारताने नाबाद ३६ धावांपासून सामन्याच्या तिसऱ्या दिवसची सुरुवात केली आणि दिवसाचा शेवट होईपर्यंत तीन विकेट्सच्या नुकसानावर २८९ धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्मा अपेक्षित खेळी करू शकला नाही, पण शुबमन गिलने स्वतःचे शतक पूर्ण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा स्कोर २८९/३ आहे. विराट कोहली ५९ आणि रवींद्र जडेजा १६ धावांवर खेळत आहे. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा १९१ धावांनी मागे आहे. जडेजा आणि कोहली यांच्यात ४४ धावांची भागीदारी झाली आहे. या दोघांनाही सामन्याच्या चौथ्या दिवशी मोठी भागीदारी करून टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणायचे आहे. पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारून शेवटच्या ऑस्ट्रेलियन संघाला सामन्यातून बाहेर काढण्याचा भारताचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन, टॉड मर्फी आणि  मॅथ्यू कुह्हेनमन यांनी तिघांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली बाकी कोणालाही यश मिळाले नाही. पुजारा ४२ धावा करून बाद झाला तर रोहितने देखील खराब फटका मारण्याच्या नादात विकेट गमावली तो ३५ धावांवर बाद झाला.

आतापर्यंतच्या सामन्यात काय घडलं?

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. उस्मान ख्वाजाने १८० आणि कॅमेरून ग्रीनने ११४ धावा करून संघाला ४८० धावांपर्यंत नेले. टॉड मर्फीने अखेरीस उपयुक्त ४१ धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सहा विकेट घेत कांगारू संघाचा डाव गुंडाळला. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही चांगली सुरुवात केली. रोहित ३५ आणि पुजारा ४२ धावा करून बाद झाला. मात्र, शुबमन गिलने शानदार फलंदाजी करताना १२८ धावा केल्या. विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तीन गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावा केल्या आहेत.

हेही वाचा: INDvsAUS 4th Test: शुबमनला बाद करण्यासाठी किती ती रडारड! केवळ तीन मीटरसाठी कांगारू थेट भिडले अंपायरसोबत, पाहा Video

शुबमन गिल याने २०२३ सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ५ आंतरराष्ट्रीय शतक ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा एकही फलंदाज मागच्या तीन महिन्यांमध्ये शतकांच्या बाबतीत गिलची बरोबरी करू शकला नाहीये. एवढेच नाही तर गिलने एकट्याने यावर्षी ५ शतके ठोकली आहेत, तर दुसरीकडे भारताच्या इतर सर्व फलंदाजांनी मिळून यावर्षी एकूण ५ शतके केली आहेत. या आकडेवारीवरून असेच दिसते की, गिल सध्या भारतीय संघातीलच नाही, तर जगातील सर्वात चांगल्या फॉर्ममध्ये असणारा फलंदाज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 4th test third days play ends in ahmedabad india score 2893 australia 191 runs ahead avw