भारतीय क्रिकेट संघासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. बीसीसीआयने मंगळवारी (३ जानेवारी) त्यांचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करणार असल्याचे सांगितले आहे. श्रीलंका संघ सध्या तीन सामन्यांची टी२० आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. उभय संघांतील वनडे मालिकेसाठी बुमराह भारतीय संघासोबत जोडला गेला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराहचे प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर पडला होता. टी२० विश्वचषकातही तो टीम इंडियाचा भाग नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी बुमराहचा भारतीय संघात समावेश होणे भारतासाठी आनंदाची बातमी आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह सप्टेंबर २०२२ पासून टीम इंडियातून बाहेर होता. दुखापतीतून सावरल्यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला. जसप्रीत बुमराहला नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये सराव केल्यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. तो लवकरच भारतीय संघात सामील होणार आहे.
२९ वर्षीय जसप्रीत बुमराहने २५ सप्टेंबर रोजी भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेत तो भारतीय संघाचा भाग होता. त्याच वेळी त्याने १४ जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. बुमराहच्या आगमनाने भारतीय वेगवान गोलंदाजी मजबूत झाली आहे. टी२० विश्वचषक २०२२ दरम्यान, भारताला बुमराहची उणीव भासली आणि भारतीय गोलंदाज उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध एकही विकेट घेऊ शकले नाहीत.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिका मंगळवारी (३ जानेवारी) सुरू होणार असून उभय संघांतील एकदिवसीय मालिका १० जानेवारी रोजी खेळला गेला. उभय संघांतील वनडे मालिकेसाठी बुरमहा भारतीय संघाचा भाग असणार आहे. बुमराहची फिटनेसची कुठली तक्रार नसल्यास त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी मिळेल, यात शंका नाही. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील पुनरागमन करणार आहेत. रोहित दुखापतीमुळे टी२० मालिकेत खेळत नाहीये, तर विराटला निवडकर्त्यांनी टी२० मालिकेतून विश्रांती दिली आहे.
मर्यादित षटकांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिकाही खेळणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. मात्र, बुमराह टी२० मालिकेत खेळणार नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग</p>