scorecardresearch

IND vs SL 1st T20: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडिया श्रीलंकेशी करणार दोन हात, कशी असेल प्लेईंग ११?

आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात विजयाने करण्यासाठी भारतीय संघ कोणाला संधी देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार.

IND vs SL 1st T20: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडिया श्रीलंकेशी करणार दोन हात, कशी असेल प्लेईंग ११?
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

भारतीय संघ २०२३ मधील पहिला सामना मंगळवारी (३ जानेवारी) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेचील सुरुवात या सामन्याने होईल. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत दुखापतच्या कारणास्तव खेळू शकणार नाही. अशात हार्दिक पंड्या संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. हार्दिकच्या नेतृत्वातील युवा खेळाडूंनी भरलेला संघ श्रीलंकेविरुद्धच्या या टी२० मालिकेत गुणवत्ता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असेल. सूर्यकुमार यादव या मालिकेत उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील या टी२० मालिकेत भारताचे वरिष्ठ खेळाडू उपलब्ध नाहीत. यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांचा उल्लेख केला जाऊ शकतो. तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे अनुभवी वेगवान गोलंदाज देखील दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. अशात श्रीलंकेविरुद्ध ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, उमरान मलिक, अर्शदीप सिंग अशा काही प्रमुख युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. उभय संघांतील पहिला सामना मंगळवारी रात्री ७ वाजता वानखडे स्टेडियमवर सुरू होईल.

वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असेल का?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील पहिला टी२० सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. वानखेडेच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर फलंदाजीसाठी ती एक उत्तम खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर पडल्यानंतर चेंडू वेगाने बॅटवर येतो. यामुळे फलंदाजी करणे सोपे जाते. मात्र, याशिवाय वानखेडेच्या विकेटवर गोलंदाजांना मदत होते. विशेषत: वानखेडेच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. याशिवाय वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि चांगली हालचाल मिळते. हवामान एकदम स्वच्छ आणि कोरडे असणार आहे. मात्र ९ वाजेनंतर दव मोठ्या प्रमाणात पडेल आणि याचा फायदा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला होणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भारतीय संघ

इशान किशन, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, राहुल त्रिपाठी, मुकेश कुमार, शुबमन गिल, शिवम मावी

हेही वाचा: मोठी बातमी: सौरव गांगुली आयपीएलमध्ये परतणार! कोलकाताच्या दादावर टाकली मोठी जबाबदारी, IPL फ्रँचायझीची गुगली

श्रीलंका संघ

पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, दिलशान मदुशंका, लाहिरू कुमारा, अविष्का बंदर फर्नांडो, अशेंदुस फर्नांडो, दुय्यम फर्नांडो वेललागे, नुवान तुषारा, कसून रजिथा, सदीरा समरविक्रमा

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 17:13 IST

संबंधित बातम्या