India Tour Of Australia Full Schedule: वेस्टइंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ वनडे आणि टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान जाणून घ्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक
वेस्टइंडिजविरूद्ध कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे या दौऱ्यावर भारतीय संघ ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या दौऱ्यावरील वनडे मालिकेसाठी शुबमन गिलची वनडे संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर विराट आणि रोहित हे दोघेही गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहेत. तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या मालिकेतील पहिला वनडे सामना १९ ऑक्टोबरला पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबरला अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना २५ ऑक्टोबरला सिडनीच्या मैदानावर खेळवला जाईल.
वनडे मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना २९ ऑक्टोबरला कॅनबरामध्ये खेळवला जाईल. तर दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये, तिसरा सामना २ नोव्हेंबरला होबार्टमध्ये, चौथा सामना ६ नोव्हेंबरला गोल्ड कोस्टमध्ये आणि मालिकेतील शेवटचा टी-२० सामना ८ नोव्हेंबरला ब्रिसबेनमध्ये खेळवला जाणार आहे.
वनडे मालिकेसाठी असा आहे भारताचा संघ:
शुबमन गिल (कर्णधार) रोहित शर्मा, विराट कोहली , श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल.
टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर