IPL 2025 CSK vs PBKS Highlights: पंजाब किंग्सने चेपॉकच्या मैदानावर चेन्नईचा ५ विकेट्सने पराभव करत गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले आहे. चेन्नईचा हा यंदाच्या आयपीएलमधील चेपॉकच्या मैदानावरील सलग पाचवा पराभव आहे. यासह चेन्नईचा संघ यंदाच्या स्पर्धेतील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे.

Live Updates

IPL 2025 Chennai Super Kings vs Punjab Kings Highlights: आयपीएल २०२५ चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स सामन्याचे हायलाईट्स

23:39 (IST) 30 Apr 2025
चेन्नई आयपीएल २०२५ प्लेऑफमधून बाहेर

पंजाबी छा गये! चेन्नईचा घरच्या मैदानावर सलग५वा पराभव, IPL 2025 मधून बाहेर पडणारा सीएसके पहिला संघ

23:25 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: शशांक सिंग झेलबाद

१८व्या षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर डेवाल्ड ब्रेविसने सीमारेषेजवळ उत्कृष्ट झेल टिपला. त्याचा कॅच पाहून सर्वच जण चकित झाले. तर पुढच्या षटकात पथिरानाने श्रेयस अय्यरला क्लीन बोल्ड केलं.

23:05 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: नेहाल वढेरा झेलबाद

१५व्या षटकात मथिशा पथिरानाने तिसऱ्या चेंडूवर नेहाल वढेराला झेलबाद केलं. जडेजाने एक लो कॅच पकडत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली.

22:54 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: श्रेयस अय्यरचं अर्धशतक

श्रेयसने कमालीच्या सुरूवातीनंतर आयपीएलमध्ये आपला फॉर्म गमावला होता. पण आता त्याला पुन्हा सुर गवसला आणि श्रेयसने ३२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. यासह आता पंजाबला विजयासाठी ३६ चेंडूत ६० धावांची गरज आहे.

22:52 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: प्रभसिमरन सिंग झेलबाद

१३व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर प्रभसिमरन सिंगचा झेल पाथिरानाने ड्रॉप केला. पण अखेरच्या चेंडूवर मात्र नूर अहमदने प्रभसिमरनला सीमारेषेवर ब्रेविसकरवी झेलबाद केले.

22:40 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: प्रभसिमरन सिंगचं अर्धशतक

पहिल्या विकेटनंतर श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांनी अर्धशतकी भागीदारी रचली आहे. यासह प्रभसिमरनने ३० चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. यासह पंजाबने ११ षटकांत १ विकेट गमावत १०२ धावा केल्या आहेत.

22:13 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: चांगल्या सुरूवातीनंतर पंजाबने गमावली विकेट

पंजाब किंग्सचे सलामीवीर प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी चांगली सुरूवात करत संघाला ४ षटकांत ३६ धावांचा टप्पा गाठून दिला. पाचव्या षटकातही प्रियांशने चांगली गोलंदाजी केली. पण खलील अहमदने बाऊन्सरने प्रियांश आर्यला झेलबाद केले. प्रियांश आर्य १५ चेंडूत ५ चौकारांसह २३ धावा करत बाद झाला.


21:33 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: चेन्नई ऑल आऊट

चहलने १९व्या षटकात हॅटट्रिकसह ४ विकेट्स घेत पंजाब किंग्सला सामन्यात परत आणलं. तर अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने दुसऱ्या चेंडूवर शिवम दुबेला झेलबाद करत चेन्नईला ऑल आऊट केलं आहे. चेन्नईचा संघ १९० धावा करू शकला. सॅम करनने ८८ धावांची खेळी करत संघाला चांगल्या धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. यासह पंजाबला विजयासाठी २० षटकांत १९१ धावांची गरज आहे.

21:28 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: १९ व्या षटकात ३ विकेट

धोनी फलंदाजीला आला आणि श्रेयसने लगेच युझवेंद्र चहलला गोलंदाजी सोपवली. चहलच्या पहिल्या चेंडूवर धोनीने षटकार लगावला. तर दुसऱ्या चेंडूवर धोनी झेलबाद झाला. यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट्स घेत चहलने हॅटट्रिक घेतली आहे.

21:25 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: सॅम करन झेलबाद

सॅम करनने चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरत महत्त्वपूर्ण ८८ धावांची खेळी केली. मार्काे यान्सनच्या १८व्या षटकातील चौथ्या चेंडूवर सॅम करन विकेटच्या मागे झेलबाद झाला. करनने ४७ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ८८ धावांची खेळी करत संघाला १८ षटकांत ५ बाद १७७ धावा केल्या आहेत.

20:59 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: सॅम करनचं अर्धशतक

सॅम करन अपयशी ठरल्यानंतर पुन्हा सीएसकेच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळवली आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत शानदार अर्धशतक झळकावलं आहे. सॅम करनने ३२ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावा केल्या आहेत. यानंतर सॅम करनने सेलिब्रेशन करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

20:54 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: चौथी विकेट

१५व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अझमतुल्ला ओमरझाईने ब्रेविसला क्लीन बोल्ड करत चौथी विकेट मिळवली. ब्रेविस २६ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह ३२ धावा करत बाद झाला.

20:42 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: सॅम करन ब्रेविसची शानदार फलंदाजी

सॅम करन आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला आहे. यासह १२ षटकांत चेन्नईने ३ बाद १०८ धावा केल्या आहेत. डेवाल्ड ब्रेविस २४ धावा तर सॅम करन ४१ धावा करत खेळत आहे.

20:13 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: रवींद्र जडेजा झेलबाद

रवींद्र जडेजाने हरप्रीत ब्रारच्या पॉवरप्लेमधील अखेरच्या षटकात चौकारांची हॅटट्रिक लगावली. पण पाचव्या चेंडूवर मात्र रवींद जडेजा १७ धावा करत झेलबाद झाला. यासह पॉवरप्लेमध्ये चेन्नईला ३ धक्के बसले. पॉवरप्लेमध्ये चेन्नईने ३ विकेट्स गमावत ४८ धावा केल्या आहेत.

19:55 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: मार्काे यान्सनच्या पहिल्याच चेंडूवर विकेट

चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर यान्सनने आयुष म्हात्रेला झेलबाद केलं. आयुष म्हात्रे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर बाद झाला. यासह चेन्नईने ४ षटकांत २ बाद २८ धावा केल्या आहेत.

19:53 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: अर्शदीप सिंगने मिळवून दिला ब्रेकथ्रू

तिसऱ्या षटकात शेख रशीदने अर्शदीपच्या गोलंदाजीवर चौकार-षटकार मारले आणि अखेरीस पुढच्या चेंडूवर झेलबाद होत ११ धावांवर माघारी परतला. अर्शदीपने यासह संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

19:37 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: सामन्याला सुरूवात

पंजाब वि. चेन्नई सामन्याला सुरूवात झाली आहे. चेन्नईकडून शेख रशीद आणि आयुष म्हात्रेची जोडी मैदानावर उतरली आहे. तर अर्शदीप सिंगने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.

19:09 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन

प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकिपर), नेहल वढेरा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, मार्को जॅनसेन, अजमतुल्ला ओमरझाई, सूर्यांश शेडगे, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग</p>

19:08 (IST) 30 Apr 2025

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग इलेव्हन

शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम कुरान, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकिपर), नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

19:03 (IST) 30 Apr 2025
CSK vs PBKS Live: नाणेफेक

पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्याची नाणेफेक झाली असून पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झालं आहे. तर चेन्नईच्या संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही.

18:14 (IST) 30 Apr 2025
CSK vs PBKS Live: पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ

शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा , हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार विशाक, यश ठाकूर, मार्को यान्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अजमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू , कुलदीप सेन, प्रियांश आर्य, ऍरॉन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, प्याला अविनाश, प्रवीण दुबे.

18:13 (IST) 30 Apr 2025
CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ

एमएस धोनी(कर्णधार), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद, ऋतुराज गायकवाड

IPL 2025 CSK vs PBKS Highlights: पंजाब किंग्सने चेपॉकवर सीएसकेचा पराभव करत प्लेऑफच्या दिशेने अजून एक पाऊल टाकलं आहे.