आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३९ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन तूल्यबळ संघांमध्ये खेळवला जातोय. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असल्यामुळे राजस्थान आणि बंगळुरु संघ पूर्ण ताकतीने लढा देत आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आजच्या सामन्यात मोठी खेळी करेल अशी अपेक्षा असताना तो अवघ्या २७ धावांवर बाद झाला आहे. विशेष म्हणजे फटका मारताना गोंधळ उडाल्यामळे तो त्रिफळाचित झालाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> RCB vs RR : बंगळुरुच्या ‘जोश’समोर राजस्थानच्या ‘जोस’ने टेकले हात, फूल फॉर्ममध्ये असताना बटलर ‘असा’ झाला बाद

सलामीला आलेले जोस बटरल आणि देवदत्त पडिक्कल स्वस्तात बाद झाले. दुसऱ्या विकेटसाठी आलेला रविचंद्रन अश्विन फक्त १७ धावा करु शकला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेला राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन धडाकेबाज खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र तो मैदानावर जास्त काळासाठी तग धरू शकला नाही. त्याने २१ चेंडूंमध्ये १ चौकार आणि तीन षटकार लगावत २७ धावा केल्या.

हेही वाचा >> प्रीति झिंटाला बसला आश्चर्याचा धक्का, चेन्नई-पंजाब सामन्यामध्ये नेमकं काय घडलं?

विशेष म्हणजे वनिंदू हसरंगाने टाकलेल्या चेंडूवर संजू सॅमसन थेट त्रिफळाचित झाला आहे. वनिंदूच्या चेंडूचा सामना करताना संजू गोंधळला. त्याने बचावात्मक पवित्रा घेत मोठा फटका मारण्याचे टाळले. ऐनवेळी चेंडूने वळण घेतले आणि संजूचा थेट त्रिफळा उडाला. संजू अशा पद्धतीने बाद होईल अशी कोणालाही कल्पना नव्हती त्यामुळे राजस्थान रॉयल्सचे चाहते नाराज झाले.

हेही वाचा >> कोल्हापूरकरांचा थाटच न्यारा! डोक्याला खास फेटा बांधून झळकले वानखेडे स्टेडियमवर, पोस्टरचीही होतेय विशेष चर्चा

दरम्यान, राजस्थान रॉयल्सने वीस षटकात आठ गडी गमवत १४४ धावा केल्या. यामध्ये रियान परागने दिमाखदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने ३१ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. तर संजू सॅमसनने २७ धावा केल्या. सलामीचे जोस बटरल (८) आणि देवदत्त पडिक्कल (७) धावांवर झेलबाद झाले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 rcb vs rr rajasthan royals captain sanju samson bold by wanindu hasaranga prd