scorecardresearch

प्रीति झिंटाला बसला आश्चर्याचा धक्का, चेन्नई-पंजाब सामन्यामध्ये नेमकं काय घडलं?

पंजाब किंग्जची मालकीण असल्यामुळे प्रीति झिंटा पंजाबच्या सामन्यांना हजेरी लावते. मात्र या हंगामात पंजाबच्या सुरुवातीच्या सामन्यांदरम्यान प्रीति झिंटा दिसली नाही.

PREITY ZINTA
प्रीति झिंटा (फोटो- iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३८ वा सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला गेला. या सामन्यावर पंजाब किंग्जने आपलं नाव कोरलं. तर चेन्नई सुपर किंग्जचा ११ धावांनी पराभव झाला. सामना जिंकण्यासाठी चेन्नईने शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र फलंदाजी करताना तसेच क्षेत्ररक्षणामध्येही चेन्नईने अनेक चुका केल्या. ज्यामुळे चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना संस्मरणीय ठरला. कारण या सामन्यात पंजाबची मालकीण प्रीति झिंटाने हजेरी लावली होती. या सामन्यातील प्रीति झिंटाची एक रिअॅक्शन सध्या व्हायरल झाली आहे.

हेही वाचा >> IPL 2022, RCB vs RR : आज राजस्थान-बंगळुरु आमनेसामने, विराट कोहलीच्या कामगिरीकडे असेल सर्वांचे लक्ष

पंजाब किंग्जची मालकीण असल्यामुळे प्रीति झिंटा पंजाबच्या सामन्यांना नेहमी हजेरी लावते. मात्र या हंगामात पंजाबच्या सुरुवातीच्या सामन्यांदरम्यान प्रीति झिंटा दिसली नाही. मात्र प्रीतीने वेळ काढून चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामन्यासाठी हजेरी लावली. विशेष म्हणजे पंजाब किंग्जसाठी ती चिअरदेखील करताना दिसली. स्टेडियममध्ये येताच ती लोकांच्या नजरेतून सुटली नाही. पंजाबचा फलंदाज भानुका राजपक्षे याचा झेल टिपताना तर प्रीति झिंटाने खास रिअॅक्शन दिली.

पंजाब किंग्ज संघाच्या ४० धावा झाल्या होत्या. यावेळी भानुका राजपक्षेने मोठा फटका लगावला. चेंडू हवेत गेल्यामुळे चेन्नईच्या क्षेत्ररक्षकाने तो टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठी झेप घेऊनही त्याला झेल टिपता आला नाही. चेन्नईच्या खेळाडूने झेल टिपण्यासाठी झेप घेतल्यामुळे भानुका बाद होतो असं वाटल्यामुळे प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकला. प्रीतिने आश्चर्यचकित होत तोंडावर हात ठेवले. प्रीति झिंटाची हीच रिअॅक्शन सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

हेही वाचा >> PBKS vs CSK : ऋषी धवनच्या फेस शिल्डवरुन वसीम जाफरने रायडूला काढला चिमटा; 3D ट्विट पुन्हा व्हायरल

दरम्यान, या सामन्यात पंजाब किंग्जचा ११ धावांनी विजय झाला. या विजयासाठी शिखर धवन याने धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबला १८७ धावांपर्यंत नेऊन ठेवले. तर चेन्नईला फक्त १७६ धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबचा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन यानेदेखील पदार्पणातच भेदक गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Preity zinta reaction while bhanuka rajapaksa batting went viral in pbks vs csk match in ipl 2022 prd