IPL 2025 Who is the most expensive player of which season : आयपीएल लिलाव हा स्पर्धेइतकाच रोमांचक असतो. आपल्या आवडत्या संघाला आपल्या आवडत्या खेळाडूंसाठी बोली लावताना पाहणे हा चाहत्यांसाठी वेगळा अनुभव असतो. आयपीएल ही केवळ एक स्पर्धा नाही, तर तो क्रिकेटचा उत्सव आहे. यावेळी २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आयपीएल २०२५ चा महालिलाव होणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक हंगामाच्या लिलावात कोणता खेळाडू सर्वात महागड ठरला होता आणि त्याला किती बोली लागली होती? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही वर्षांत, आयपीएल लिलावाने क्रिकेटच्या खेळाला अनेक अनोळखी चेहरे दिले आहेत, जे मोठे नाव आणि करोडपती झाले आहेत. आयपीएल लिलावात वर्षानुवर्षे अनेक विक्रम मोडले गेले. गेल्या वेळी अनेक रेकॉर्ड नष्ट झाले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यावेळी महालिलावात एकूण ५७४ खेळाडू सहभागी होणार असून त्यापैकी ३६६ भारतीय आणि २०८ परदेशी खेळाडू आहेत.

२० फेब्रुवारी २००८ रोजी प्रथमच आयपीएलमधील खेळाडूंचा लिलाव झाला होता. त्यावेळी आयपीएलमध्ये एकूण ८ संघ होते. तेव्हापासून आयपीएल २०२४ मध्ये बरेच काही बदलले आहे. आता आयपीएलमध्ये एकूण १० संघ आहेत. अशा परिस्थितीत, आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी, प्रत्येक हंगामाच्या लिलावात कोणत्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागली होती, जाणून घेऊया.

हेही वाचा – Ashton Agar : ॲश्टन अगरच्या जिद्दीला सलाम! खांद्याला दुखापत झाली असूनही एका हाताने केली फलंदाजी, VIDEO होतोय व्हायरल

लिलावनिहाय सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू (सध्या असलेल्या डॉलरच्या दरानुसार) :

  • २००८- महेंद्रसिंग धोनी १.५ मिलिअन डॉलर्स (१२.६६ कोटी) चेन्नई सुपर किंग्ज</li>
  • २००९- अँड्यू फ्लिनटॉफ (सीएसके) आणि केव्हिन पीटरसन (आरसीबी) १.५५ मिलिअन डॉलर्स (१३.०८ कोटी प्रत्येकी)
  • २०१०- शेन बाँड (केकेआर) आणि कायरन पोलार्ड (एमआय) ७५० के डॉलर्स (६.३३ कोटी प्रत्येकी)
  • २०११-गौतम गंभीर २.४ मिलिअन डॉलर्स (२०.२५ कोटी) कोलकात नाईट रायडर्स
  • २०१२- रवींद्र जडेजा २ मिलिअन डॉलर्स (१६.८८ कोटी) चेन्नई सुपर किंग्ज
  • २०१३- ग्लेन मॅक्सवेल १ मिलिअन डॉलर्स (८.४४ कोटी) मुंबई इंडियन्स
  • २०१४- युवराज सिंग (१४ कोटी) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
  • २०१५- युवराज सिंग (१६ कोटी) दिल्ली डेअरडेव्हिल्स
  • २०१६- शेन वॉटसन (९.५ कोटी) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
  • २०१७- बेन स्टोक्स (१४.५ कोटी) रायजिंग पुणे सुपरजायंट्स
  • २०१८- बेन स्टोक्स (१२.५ कोटी) राजस्थान रॉयल्स
  • २०१९- जयदेव उनाडकट (८.४ कोटी) राजस्थान रॉयल्स
  • २०२०- पॅट कमिन्स (१५.५ कोटी) कोलकात नाईट रायडर्स
  • २०२१- ख्रिस मॉरिस (१६.२५ कोटी) राजस्थान रॉयल्स
  • २०२२- इशान किशन (१५.२५ कोटी) मुंबई इंडियन्स
  • २०२३- सॅम करन (१८.५ कोटी) पंजाब किंग्ज
  • २०२४- मिचेल स्टार्क (२४.७५ कोटी) कोलकात नाईट रायडर्स
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 from ms dhoni to mitchell starc which player was the most expensive in each season see the complete list vbm