IPL 2025 LSG vs SRH Highlights: आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून लखनौ सुपर जायंट्सचा संघ बाहेर झाला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने लखनौचा ६ विकेट्स आणि १० चेंडू राखून पराभव केला. लखनौच्या या पराभवासह संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आणि आयपीएल 2025 मधून बाहेर पडणारा पाचवा संघ ठरला आहे.
IPL 2025 Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad Highlights : आयपीएल २०२५ लखनौ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे हायलाईट्स
LSG vs SRH LIVE: लखनौ स्पर्धेबाहेर
लखनौ सुपर जायंट्स संघाचा हैदराबादने १० चेंडू राखून आणि ६ विकेट्सने विजय मिळवला. यासह लखनौचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
LSG vs SRH LIVE: इशान किशन क्लीन बोल्ड
दिग्वेश राठीने १२व्या षटकात इशान किशनला क्लीन बोल्ड करत सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का दिला. तर लखनौच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या.
अभिषेक शर्माने १८ चेंडूत ५३ धावा करत वादळी अर्धशतक झळकावलं. पण अभिषेक शर्मा पुढच्याच आठव्या षटकात दिग्वेश राठीने २० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५९ धावा केल्या. दिग्वेश राठीच्या नोटबुक सेलिब्रेशनमुळे अभिषेक आणि दिग्वेश राठीमध्ये वादही झाला.
LSG vs SRH LIVE: पहिली विकेट
लखनौने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि अथर्व तायडे फलंदाजीला उतरले. अथर्व तायडे ३ चौकारांसह चांगली सुरूवात करत झेलबाद झाला.
मिचेल मार्श आणि एडन मारक्रमच्या भागीदारीच्या जोरावर लखनौने चांगली सुरूवात केली. तर निकोलस पुरनची बॅटही चांगली चालली. पण निकोलस पुरन २६ चेंडूत ४५ धावा करत ईशान किशनच्या गोलंदाजीवर धावबाद झाला. यासह लखनौने २० षटकांत ५ विकेट्स गमावत २०५ धावा केल्या. एडन मारक्रम आणि मिचेल मार्श यांनी अर्धशतकं झळकावत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यासह लखनौने हैदराबादला विजयासाठी २०६ धावांचं आव्हान दिलं.
LSG vs SRH LIVE: अखेरचं षटक ९ चेंडूंचं
पॅट कमिन्सने अखेरचं षटक टाकण्याची जबाबदारी नितीश रेड्डीला दिली. पहिलाच चेंडू नितीशने वाईड टाकला. दुसऱ्या चेंडूवर पुरनने षटकार लगावला. तर दुसऱ्या चेंडू पुन्हा वाईड टाकला. तर दुसऱ्या लीगल चेंडूवर एक धाव घेतली. तर तिसऱ्या चेंडूवर २ धावा घेण्याच्या नादात पुरन धावबाद झाला. चौथ्या चेंडूवर येताच शार्दुलने चौकार लगावला. तर पाचव्या चेंडूवर शार्दल ठाकूर वाईड चेंडूवर धावबाद झाला. पाचव्या चेंडूवर अब्दुल समद क्लीन बोल्ड झाला. तर सहाव्या चेंडूवर आकाशदीपने षटकार लगावला.
LSG vs SRH LIVE: मारक्रम क्लीन बोल्ड
16व्या षटकात हर्षल पटेलने एडन मारक्रमला क्लीन बोल्ड करत बाद केलं. तर आयुष बदोनी ३ धावा करत झेलबाद झाला.
LSG vs SRH LIVE: मारक्रमचे अर्धशतक
मिचेल मार्शनंतर एडन मारक्रमने ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह लखनौने १३ षटकात २ बाद १३२ धावा केल्या आहेत.
LSG vs SRH LIVE: ऋषभ पंत बाद
ऋषभ पंत पुन्हा एकदा आयपीएल २०२५ मध्ये अपयशी ठरला. इशान मलिंगाने १२ व्या षटकात सहाव्या चेंडूवर झेलबाद केलं. पंत एका चौकारासह ७ धावा करत बाद झाला.
हर्ष दुबेने ११ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मिचेल मार्शला झेलबाद संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. हर्ष दुबे हा विदर्भचा खेळाडू आहे, ज्याने रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये सर्वाधिक विकेट घेतले होते.
LSG vs SRH LIVE: मिचेल मार्शचं अर्धशतक
मिचेल मार्शने ८व्या षटकात २८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलंय. यासह लखनौने ९ षटकांतच १०० धावा पूर्ण केल्या. तर मारक्रम ४० धावांवर खेळत आहे.
LSG vs SRH LIVE: लखनौ संघाचं अर्धशतक
लखनौ सुपर जायंट्स संघाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि एडन मारक्रमने वादळी फटकेबाजी केली आहे. लखनौने वादळी फटकेबाजीसह ५ षटकं पूर्ण होण्यापूर्वीच ५० धावांचा आकडा पार केला आहे. तर संघाने ५ षटकांत एकही विकेट न गमावता ५७ धावा केल्या आहेत. मारक्रम २२ धावा तर मार्श ३४ धावा करत खेळत आहेत.
LSG vs SRH LIVE: मिचेल मार्शची फटकेबाजी
मिचेल मार्शने पॅट कमिन्सच्या पहिल्याच चेंडूवर चौकारासह सुरूवात केली. तर नंतर एक षटकार लगावत पहिल्याच षटकात ११ धावा केल्या.
LSG vs SRH LIVE: सनरायझर्स हैदराबाद
इशान किशन, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कामिंदू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, हर्ष दुबे, झीशान अन्सारी, इशान मलिंगा
LSG vs SRH LIVE: लखनौ सुपर जायंट्स
एडन माक्ररम, मिचेल मार्श, निकोलस पुरन, ऋषभ पंत (कर्णधार/ यष्टीरक्षक), आयुष बदोनी, अब्दुल समद, आकाशदीप, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, आवेश खान, विल्ययम ओरूक
लखनौ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्याची नाणेफेक हैदराबाद संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद संघात आज ट्रॅव्हिस हेड खेळताना दिसणार नाहीये. तर विदर्भकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा हर्ष दुबे आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे.
LSG vs SRH LIVE: सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, ॲडम झाम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, वियान मुल्डर, कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, एशान मलिंगा, सचिन बेबी.
LSG vs SRH LIVE: लखनौ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ
ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, एडन मारक्रम, मिचेल मार्श, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंग, एम सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, शाहबाज अहमद, आकाश सिंग, शमर जोसेफ (आरटीएम) , प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगेरकर, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रिट्झके