IPL 2025 PBKS vs DC Highlights: आयपीएल २०२५ मधील ५८वा सामना धरमशालामध्ये खेळवण्यात येत होता, हा सामना अचानक रद्द करण्यात आला आहे. सामना सुरू असताना अचानक फ्लडलाईट बंद झाला आणि त्यानंतर दुसरे फ्लडलाईट्स बंद करण्यात आले आणि सामना रद्द केल्याची घोषणा करण्यात आली. सामन रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला.
IPL 2025 Punjab Kings vs Delhi Capitals Highlights: आयपीएल २०२५ पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्याचे हायलाईट्स
धरमशालामधील पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामना अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. टेक्निकल कारणामुळे हा सामना रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. खाली सविस्तर वाचा
PBKS vs DC: धरमशालामधील पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामना अचानक रद्द, काय आहे नेमकं कारण?
धरमशालाच्या स्टेडियमवरील एक फ्लडलाईटची एक बाजू बंद पडली होती. पण आता अजून दोन फ्लडलाईटचे खांब बंद पडले असून मैदानातील एक फ्लडलाईटच सुरू आहे.
We have a bit of a delay because one of the floodlights has decided to malfunction! ?#IPL2025 #PBKSvsDC | ? : JioHotstar pic.twitter.com/bBprpxO7cE
— OneCricket (@OneCricketApp) May 8, 2025
PBKS vs DC LIVE: सामना पुन्हा थांबवला
पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना पुन्हा एकदा थांबवण्यात आला आहे. पंजाबने वादळी सुरूवात करत १० षटकांत १२२ धावा केल्या आणि त्यानंतर ११व्या षटकातील पहिल्या चेंडूवर पंजाबने विकेट गमावली. यानंतर मैदानावरील एक फ्लडलाईट अचानक बंद झाला. त्यामुळे टेक्निकल कारणास्तव सामना काही वेळ थांबवण्यात आला आहे.
PBKS vs DC LIVE: नटराजनच्या खात्यात पहिली विकेट
दिल्लीचा गोलंदाज टी नटराजनने ११व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर प्रियांश आर्यला झेलबाद करवत संघाला पहिली विकेट मिळवून दिली आहे. प्रियांश आर्य ३४ चेंडूत ५ चौकार ६ षटकारांसह ७० धा्वा करत बाद झाला.
PBKS vs DC LIVE: प्रभसिमरनचं अर्धशतक
पंजाब किंग्सचा दुसरा सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सलग चौथं अर्धशतक झळकावलं आहे. प्रभसिमरन सिंगने २८ चेंडूत ७ चौकारांसह अर्धशतक पूर्ण केलं आहे.
PBKS vs DC LIVE: वादळी फटकेबाजी
पंजाब किंग्सचे दोन्ही सलामीवीर प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी वादळी फटकेबाजी करत ९ षटकांत १०३ धावा केल्या आहेत. प्रभसिमरन ४५ तर प्रियांश आर्य ५६ धावा करत खेळत आहे.तर दिल्लीचे गोलंदाज पहिल्या विकेटच्या प्रतिक्षेत आहे.
पंजाब किंग्सचा अनकॅप्ड सलामीवीर प्रियांश आर्यने वादळी फटकेबाजी करत आपले अर्धशतक झळकावले आहे. प्रियांशने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५० धावा पूर्ण केल्या. यासह पंजाबने ७ षटकांत बिनबाद ७९ धावा केल्या आहेत.
PBKS vs DC LIVE: पॉवरप्ले
प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्यने वादळी फटकेबाजी करत पॉवरप्लेमध्ये ६९ धावा केल्या आहेत. दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाच्या षटकात दोघांनी चांगल्याच धावा केल्या आहेत.
प्रियांश आर्य आणि प्रभसिमरनची चांगलीच फटकेबाजी सुरू आहे. दरम्यान दोन्ही खेळाडूंनी ४ षटकांत बिनबाद ५० धावा केल्या आहेत. तर ५ षटकांत प्रभसिमरन आणि प्रियांशाने ६५ धावा केल्या आहेत.
PBKS vs DC LIVE: प्रियांश आर्यची चांगली सुरूवात
प्रियांश आर्यने मिचेल स्टार्कच्या सामन्यातील पहिल्या दोन चेंडूवर चौकार लगावत शानदार सुरूवात केली. यासह स्टार्कने पहिल्या षटकात ११ धावा दिल्या.
PBKS vs DC LIVE: दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन
फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकिपर), केएल राहुल, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी नटराजन
PBKS vs DC LIVE: पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन
प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकिपर), शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, अजमतुल्ला ओमरझाई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग</p>
पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्याची नाणेफेक पंजाबने जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या ताफ्यात एक मोठा बदल करण्यात आला आहे. विप्रज निगमच्या जागी संघात माधव तिवारी या गोलंदाजाला सामील केलं आहे. तर करूण नायरच्या जागी समीर रिझवीला संधी दिली आहे.
PBKS vs DC LIVE: पंजाब वि. दिल्ली सामना
धरमशालामधील पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्याबाबत अपडेट आली आहे. या सामन्याची नाणेफेक ८.१५ ला होईल आणि सामना ८.३० वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे सामना पूर्ण २० षटकांचा होईल.
PBKS vs DC LIVE: पावसाची विश्रांती
धरमशालामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी मैदान सामन्यासाठी तयार करण्यात वेळ जाते. ग्राऊंडस्टाफ मैदान तयार करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे सामना कधी सुरू होणार यासाठी ८ वाजता मैदानाची पाहणी केली जाणार आहे.
PBKS vs DC LIVE: पावसाने घेतली विश्रांती
धरमशालामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. पंजाब आणि दिल्ली दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर वॉर्म अपसाठी उतरले आहेत. लवकरच नाणेफेक होईल.
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नाणेफेक लवकरच होईल, अशी आशा होती. पण आता पावसाने पुन्हा हजेरी लावली असून सतत पाऊस पडत आहे. मैदानावर पुन्हा कव्हर्स टाकण्यात आले आहेत.
आयपीएल २०२५ मधील पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामना धरमशालामध्ये खेळवला जात आहे. पण हा सामना उशिरा सुरू होणार आहे. कारण पावसाने सामन्यापूर्वी हजेरी लावली आहे. त्यामुळे नाणेफेकदेखील उशिरा होईल.
PBKS vs DC – TOSS DELAYED DUE TO RAIN…!!! pic.twitter.com/eErMebTFYc
— Johns. (@CricCrazyJohns) May 8, 2025
अक्षर पटेल (कर्णधार), करुण नायर, हॅरी ब्रूक, जॅक फ्रेझर मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फेरेरिया, केएल राहुल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, अजय मंडल, विपराज निगम, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, मोहित शर्मा, टी. नटराजन, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव
श्रेयस अय्यर (कर्णधार), युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा , हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार विशाक, यश ठाकूर, मार्को यान्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अजमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू , कुलदीप सेन, प्रियांश आर्य, ऍरॉन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, प्याला अविनाश, प्रवीण दुबे,शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग,