MI vs RR Playing 11 Prediction Today Match: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा आज ३६वा वाढदिवस आहे. रोहित शर्माच्या वाढदिवशी मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील १०००वा सामना खेळणार आहे. म्हणजेच आयपीएलचा १०००वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. १८ एप्रिल २००८ रोजी आयपीएलची सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत झाला. २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ चॅम्पियन बनला होता. त्यानंतर तिला विजेतेपद मिळालेले नाही. मुंबई इंडियन्सचा संघ सर्वाधिक पाच वेळा चॅम्पियन बनला आहे. योगायोगाने, १०००व्या सामन्यात, प्रथम वेळचा चॅम्पियन आणि सर्वाधिक वेळा जिंकलेला संघ आमनेसामने असतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुणतालिकेत दोन्ही संघांचे स्थान

राजस्थान रॉयल्सच्या संघाने यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आठपैकी पाच सामने जिंकले आहेत. त्याला १० गुण आहेत. ते गुजरात टायटन्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी काही विशेष झाली नाही. त्याला सातपैकी केवळ तीनच सामने जिंकता आले आहेत. मुंबईचे सहा गुण झाले असून ते नवव्या स्थानावर आहे. राजस्थानचा संघ आज जिंकला तर अव्वल स्थान गाठेल. त्याचबरोबर मुंबईचा संघ जिंकल्यास सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर पोहोचू शकतो.

मुंबईच्या अर्जुन तेंडुलकरवर सर्वांचे लक्ष असणार

मुंबईचा कॅमेरून ग्रीन फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करत असून, त्याचा संघाला फायदा होत आहे. त्याचबरोबर टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा दमदार खेळी करत आपले योगदान देत आहेत. तसेच, गोलंदाजीत अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आपल्या गोलंदाजीने प्रभावी ठरत असून विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्याच्याशिवाय अन्य वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ संघाला लवकर विकेट मिळवून देतो, तर अनुभवी फिरकी गोलंदाज पियुष चावलाची फिरकी गोलंदाजीही संघासाठी उपयुक्त आहे. मात्र, अखेरच्या षटकांची गोलंदाजी हा मुंबईसाठी चिंतेचा विषय राहिला आहे.

हेही वाचा: WTC Final: ऑस्ट्रेलिया सावधान! कौंटी क्रिकेट गाजवणारा खेळाडू कांगारूंना पाणी पाजण्यासाठी सज्ज

राजस्थानचे फिरकी त्रिकूट धोकादायक

कर्णधार संजू सॅमसनच्या टीम राजस्थानची टॉप ऑर्डर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वाल, जॉस बटलर चांगले फॉर्मात आहेत. दुसरीकडे ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल हे देखील फॉर्ममध्ये परतले आहेत. त्यांच्याशिवाय रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल आणि अॅडम झम्पा या फिरकी त्रिकुटाला खेळणे हे कोणत्याही फलंदाजासाठी आव्हान असेल.

आज रोहित शर्माचा ३६वा वाढदिवस

रोहित शर्माने वाढदिवसाच्या एक दिवस आधी वाढदिवसाची पार्टी दिली, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडू होते. सर्व खेळाडू स्टायलिश लूकमध्ये आले होते. रोहित पत्नी रितिका सजदेहसोबत पार्टीत पोहोचला. रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी रितिका सजदेह हिरव्या आणि काळ्या रंगाच्या वन पीसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mi vs rr playing 11 rajasthan in front of mumbai in historic match rohits team will try to avoid third consecutive defeat avw