Suryakumar Yadav vs Mitchell Santner: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या सामन्यात मुंबई संघ मोसमातील पहिला विजय नोंदवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहितच्या संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याच वेळी, लखनऊ सुपर जायंट्सवर विजय नोंदवल्यानंतर सीएसकेचा उत्साह वाढला आहेत. दोन्ही आयपीएलचे सर्वात यशस्वी संघ आहेत. अशा परिस्थितीत चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि मिचेल सँटनरही आमनेसामने असतील.
सूर्या-सँटनरमध्ये निकराची लढत होईल.

सूर्यकुमार विरुद्ध सँटनर हेड टू हेड –

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव आणि मिचेल सँटनर यांच्यात निकराची लढत होणार आहे. सीएसकेचा गोलंदाज सँटनरविरुद्ध सूर्याला जास्त धावा करता आलेल्या नाहीत. सूर्याला मोठे फटके खेळताना अडचणीचा सामना करावा लागला आहे. या दोघांमधील हेड टू हेड आकड्यांबद्दल बोलताना सूर्यकुमार सँटनरसमोर संघर्ष करत आहे. सीएसकेच्या गोलंदाजाने ७ टी-२० सामन्यांमध्ये सूर्याला दोनदा बाद केले आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवला ५६ चेंडूत ५२ धावा करता आल्या. इतकेच नाही तर सूर्याने चेन्नईचा गोलंदाज रवींद्र जडेजाविरुद्ध ५५ चेंडूत केवळ ४३ धावा केल्या आहेत. यादरम्यान जडेजाने त्याला ३ वेळा बादही केले आहे.

हेही वाचा – IPL 2023 MI vs CSK: चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई संघाला मोठा धक्का; ‘हा’ प्रमुख वेगवान गोलंदाज महत्त्वाच्या सामन्याला मुकणार?

मुंबई पहिल्या विजयाच्या शोधात –

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ मोसमातील पहिला विजय नोंदवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. दोन एप्रिल रोजी बंगळुरू येथे आरसीबी विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात बंगळुरूने मुंबईचा ८ गडी राखून पराभव करत एकतर्फी विजयाची नोंद केली होची. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ७ गड्यांच्या मोबदल्यात १७१ धावा केल्या होत्या. आरसीबीने विजयासाठी मिळालेले १७२ धावांचे लक्ष्य २२ चेंडू शिल्लक असताना २ गडी गमावून पूर्ण केले.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

चेन्नई सुपर किंग्ज : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), शिवम दुबे, मिचेल सँटनर/सिसंड मगला, दीपक चहर, राजवर्धन हंगेरगेकर.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन/ट्रिस्टन स्टब्स, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर, अर्शद खान.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitchell santner and suryakumar yadav will see a clash between mi and csk vbm