Shashak Singh Performance in IPL 2024 : आयपीएल २०२४चा हंगाम सुरुवातीलाच रंगतदार होताना दिसत आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. पंजाब किंग्जच्या शशांक सिंगने आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही त्याने पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र संघ विजयापासून अवघ्या २ धावा दूर राहिला. तरीही तो आपल्या फलंदाजीने छाप पाडण्यात यशस्वी ठरला आहे. यंदाच्या हंगामात शशांक एका वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसला असून पाचपैकी एकाच डावात आऊट झाला आहे.

शशांक सिंगने दाखवून दिली आपली ताकद –

आयपीएल २०२४ मध्ये, शशांक सिंगने पंजाब किंग्जकडून पाच सामने खेळले आहेत आणि तो फक्त एकदाच आऊट झाला आहे. उर्वरित चार सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज त्याला आऊट करण्यात अपयशी ठरले आहेत. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने अवघ्या २९ चेंडूत ६७ धावा करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. शशांक सिंगने आतापर्यंत आयपीएलमध्ये ०, २१, ९, ६१ आणि ४६ धावांची इनिंग खेळली आहे.

आयपीएल २०२४ मध्ये शशांक सिंगने खेळलेल्या इनिंग्स:

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध – ० धावा
आरसीबी विरुद्ध – २१ धावा नाबाद
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध – नाबाद ९ धावा
गुजरात टायटन्स विरुद्ध – नाबाद ६१ धावा
सनरायझर्स हैदराबाद- नाबाद ४६ धावा

हेही वाचा – IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य

पंजाब किंग्सने इतके पैसे दिले –

शशांक सिंगला पंजाब किंग्ज संघाने २० लाख रुपयांना विकत घेतले आहे. तो यापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. आयपीएल २०२२ मध्ये त्याने १० सामने खेळले. त्यानंतर त्याला केवळ ६९ धावा करता आल्या होत्या. यंदा आयपीएल २०२४ मध्ये त्याने केवळ पाच सामन्यांमध्ये २०६ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IPL 2024 : मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर मुलाने मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’, VIDEO होतोय व्हायरल

शशांक सिंगने २१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८५८ धावा केल्या आहेत ज्यात १ शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ३० लिस्ट-ए सामन्यांमध्ये ९८६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने दोन शतके झळकावली आहेत. त्याने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ३३ विकेट्सही घेतल्या आहेत. शशांकमध्ये मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे हे त्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे.