Mohammad Nabi’s Son Helicopter Shot Video Viral : आयपीएल २०२४ मधील २५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हा सामना गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये मुंबईची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक आहे. सलग तीन सामने हरल्यानंतर त्याने विजयाची नोंद केली. आरसीबीविरुद्ध मुंबईच्या सामन्यापूर्वी मोहम्मद नबीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो आपल्या मुलासोबत मैदानावर दिसत आहे. ज्यामध्ये नबीचा मुलगा एमएस धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट खेळताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे.

वास्तविक नबी आपल्या मुलाबरोबर क्रिकेट खेळताना दिसत आहे. यादरम्यान त्याने आपल्या मुलाला गोलंदाजी केली, ज्यावर त्याच्या मुलांने एमएस धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारला. या बाप-लेकांच्या सामन्याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने एक्सवर शेअर केला आहे. अनेकांना नबीच्या मुलाचा हेलिकॉप्टर शॉट प्रचंड आवडला आहे. या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.

Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Ravi Shastri Posted a Unique photo on Twitter went viral
रवी शास्त्रींच्या फोटोने सोशल मीडियावर चर्चेला उधाण, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस
Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

विशेष म्हणजे अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नवी हा मुंबई इंडियन्स संघचा भाग आहे, परंतु त्याला अद्याप आयपीएल २०२४ मध्ये जास्तसामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. अफगाणिस्तानच्या नबीने या हंगामात आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे. त्याने आतापर्यंत एकूण १९ आयपीएल सामने खेळले आहेत. या कालावधीत १३ विकेट घेतल्या आहेत. एका सामन्यात ११ धावांत ४ विकेट्स घेणे ही नबीची सर्वोत्तम कामगिरी होती. २०२२ आणि २०२३ मध्ये तो खेळू शकला नाही. यापूर्वी २०२१ मध्ये खेळला होता. त्याने या हंगामातील ३ सामन्यांमध्ये भाग घेतला होता.

हेही वाचा – VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले

३९ वर्षीय नबीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने अफगाणिस्तानसाठी ३ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि १२१ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने साडेपाच हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने २ शतके आणि २२ अर्धशतकेही केली आहेत. तो एक चांगला ऑफ-स्पिनर देखील आहे आणि त्याने कसोटीत ८ विकेट्स, एकदिवसीय सामन्यात १६९ आणि टी-२० मध्ये ९३ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा – SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे

मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी या मोसमात ४ सामने खेळले आहेत. या कालावधीत ३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा गुजरात टायटन्सकडून ६ धावांनी पराभव झाला. यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ३१ धावांनी पराभव केला. तसेच तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून ६ धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर चौथ्या सामन्यात मुंबईने दिदिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आपल्या विजयाचे खाते उघडले. या सामन्यात मुंबई इंडियन्सने २९ धावांनी दिल्ली कॅपिटल्सचा धुवा उडवला.