Ruturaj Gaikwad hits fifty against Gujarat: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२३ चा पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी, २३ मे रोजी खेळला गेला. ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने १५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ७ गडी गमावून १७२ धावा केल्या. संघाच्या वतीने ऋतुराज गायकवाडने ४४ चेंडूत ६० धावांची शानदार खेळी केली. या खेळीनंतर गायकवाडने आरसीबीच्या विराट कोहलीचा एक खास विक्रम मोडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गायकवाडच्या खेळीत ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. गुजरात आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत ४ सामने झाले असून सर्व सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाडने अर्धशतक झळकावले आहे. गायकवाडने गुजरातविरुद्ध ४ डावात ६९.५ च्या सरासरीने आणि १४५.५ च्या स्ट्राईक रेटने २७८ धावा केल्या आहेत. तर, विराट कोहलीने गुजरातविरुद्ध तीन डावात ११६ च्या सरासरीने आणि १३८.१ च्या स्ट्राईक रेटने २३२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत.

गायकवाडने गुजरातविरुद्ध कोहलीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आयपीएल २०२३ चा पहिला लीग सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये गुजरातने ५ विकेट्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर गायकवाडने ९२ धावांची खेळी करत सर्वांची मने जिंकली होती. गायकवाडने आतापर्यंत गुजरातविरुद्ध चार सामन्यांत ७३(४८), ५३(४९), ९२(५०) आणि ६०(४४) धावा केल्या आहेत.

हेही वाचा – CSK vs GT Qualifier 1: “मी खूप त्रासदायक …”; अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर एमएस धोनीने दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

गुजरातला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी –

चेन्नईविरुद्धचा पहिला क्वालिफायर सामना हरल्यानंतर गुजरात टायटन्सला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी आहे. हा संघ आपला दुसरा क्वालिफायर सामना २६ मे, शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे. या सामन्यात गुजरातचा सामना कोणत्या संघाशी होणार हे २४ मे, बुधवारी लखनऊ आणि मुंबई यांच्यात होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यातून ठरवले जाईल. हा सामना जिंकणारा संघ गुजरातविरुद्ध दुसरा क्वालिफायर खेळेल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruturaj gaikwad surpassed virat kohli in scoring the most runs against gujarat vbm