Jiocinema IPL Features: भारत हा देश क्रिकेटप्रेमी देश म्हणून ओळखला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही ठिकाणी खेळाला जाणारा हा खेळ आहे. लवकरच आता IPL २०२३ सुरु होणार आहे. काही दिवसांपूर्वीच याचा लिलाव देखील पार पडला आहे. सुमारे एक ते दीड महिना आयपीएलच्या मॅचेस सुरु असतात. मात्र IPL च्या दृष्टीने क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Ipl संदर्भात Reliance Jio ने एक घोषणा केली आहे. जिओ ने सांगितले आहे की, इंडियन प्रीमिअर लीग २०२३ (IPL) आता jio cinema वॉर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहे. ३१ मार्चपासून आयपीएल २०२३ ला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या टीममध्ये होणार आहे. jio cinema वर सर्व आयपीएलचे सामने 4K रिझोल्यूशन (UltraHD) मध्ये ऑनलाइन स्ट्रीम केले जाणार आहेत. या आधी फक्त IPL केवळ Disney+ Hotstar वरच स्ट्रीम केले जात होते आणि यासाठी तुम्हाला सब्स्क्रिप्शन घ्यावे लागत होते.

हेही वाचा : आजपासून OnePlus च्या ‘या’ स्मार्टफोनच्या प्री-बुकिंगला सुरुवात, मिळणार जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या

FIFA World Cup 2022 Multicam फीचरसह JioCinema वर वापरकर्ते सर्व ७४ सामन्यांदरम्यान कॅमेरा अनेक अँगलमध्ये स्विच करू शकणार आहेत. jiophone वापरकर्ते IPL २०२३ मोफत पाहू शकणार आहेत कारण या फिचर फोनमध्ये आधीपासूनच JioCinema सपोर्ट उपलब्ध आहे. अ‍ॅपच्या मदतीने वापरकरते फोनवरच स्कोअर आणि पिच हीट मॅप सारखी आकडेवारी बघू शकणार आहेत. मोठ्या स्क्रीन म्हणजेच टीव्हीवर सामना पाहणारे वापरकर्ते पूर्ण माहितीसह सामना बघू शकणार आहेत.

१२ भाषांमध्ये बघता येणार

JioCinema वापरकर्ते १२ भाषांमध्ये सामने बघू शकणार आहेत. वापरकर्ते इंग्रजी, तमिळ, हिंदी, तेलगू, मराठी, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी यासह अनेक भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेऊ शकतील. भाषांमध्ये बदल केल्याने केवळ कॉमेंट्री नाही तर निवडलेल्या भाषेतील ग्राफिक्स आणि डायग्राम देखील बदलतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio jiocinema users watch ipl 2023 in 4k resolution tmb 01