इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) आगामी हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. आयपीएलचा सोळावा हंगाम सुरू होण्यापूर्वी या महिन्याच्या २३ तारखेला कोची येथे खेळाडूंचा लिलाव होणार आहे. सर्व १० फ्रँचायझी संघांसोबतच चाहतेही आयपीएलच्या मिनी लिलावाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलच्या मिनी लिलावासाठी ९९१ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ७१४ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दुजोरा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२ कोटींच्या मूळ किमतीच्या गटात एकही भारतीय नाही –

लिलावासाठी ज्या नामवंत खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत, त्यात बेन स्टोक्स, कॅमेरॉन ग्रीन, सॅम कुरन या खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांची मूळ किंमत २-२ कोटी रुपये आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २ कोटी आणि १.५ कोटींच्या मूळ किमतीच्या गटात एकाही भारतीय खेळाडूचे नाव नाही. मयंक अग्रवालसह काही भारतीय खेळाडूंची नावे १ कोटींच्या मूळ किंमतीच्या यादीत नक्कीच आहेत. आयपीएल लिलावाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, ज्यामध्ये २ आणि १.५ कोटी रुपयांच्या, मूळ किमतीच्या गटात एकाही भारतीय खेळाडूच्या नावाचा समावेश नाही.

IPL 2023 New Rule: कोणताही विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर बनू शकत नाही, जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट

दोन कोटी मूळ किंमतीचा गट –

नॅथन कुल्टर-नाईल, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, ख्रिस लिन, टॉम बॅंटन, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, जेमी ओव्हरटन, क्रेग ओव्हरटन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, अ‍ॅडम मिल्ने, जिमी नीशम, केन विल्यमसन, रिले रोसो, रॅसी व्हॅन डर डसेन, अँजेलो मॅथ्यूज, निकोलस पूरन आणिजेसन होल्डर.

१.५ कोटी मूळ किंमतीचा गट:

शॉन अ‍ॅबॉट, रिले मेरेडिथ, झ्ये रिचर्डसन, अ‍ॅडम झाम्पा, शाकिब अल हसन, हॅरी ब्रूक, विल जॅक्स, डेविड मलान, जेसन रॉय आणि शेरफेन रदरफोर्ड.

१ कोटी मूळ किंमतीचा गट:

मयंक अग्रवाल, केदार जाधव, मनीष पांडे, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, मोइसेस हेन्रिक्स, अँड्र्यू टाय, जो रूट, ल्यूक वुड, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, मार्टिन गुप्टिल, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेनरिक क्लासेन, तबरेझ शम्सी, कुसल परेरा, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल, शाई होप, अकिल हुसेन आणि डेव्हिड विसे.

हैदराबाद-पंजाबवर असणार नजर –

खेळाडूंच्या मिनी लिलावापूर्वी १० संघांनी बरेच खेळाडू सोडले आहेत. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादला आता कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे. त्याचवेळी पंजाब किंग्ज मयंक अग्रवाल, ओडिअन स्मिथच्या जागी देखील नवा खेळाडू पाहणार आहेत. तसे, मयंक मिनी लिलावाद्वारे विल्यमसन आपल्या जुन्या संघात पुन्हा सामील होण्याची शक्यता देखील आहे.

आयपीएल २०२३ कधी सुरू होईल?

आयपीएल २०२३ चे आयोजन फक्त भारतीय भूमीवर केले जाईल आणि यावेळी सर्व संघांना त्यांच्या घरीही सामने खेळता येतील. रिपोर्ट्सनुसार, यावेळी आयपीएलचे आयोजन मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केले जाऊ शकते. तसे, अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे. या दरम्यान, १० संघांमध्ये एकूण ७४ सामने होणार आहेत, ज्यामध्ये प्रत्येक संघ ७ घरच्या होम आणि ७ बाहेरच्या मैदानावर सामने खेळणार आहे. आयपीएल २०२२ च्या हंगामात एकूण ७४ सामने देखील आयोजित करण्यात आले होते. सर्व संघांनी १४-१४ लीग सामने खेळले होते.

हेही वाचा – Vijay Hazare Trophy 2022 Final: ऋतुराजच्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने सौराष्ट्रला दिले २४९ धावांचे लक्ष्य

आयपीएल २०२३ मिनी लिलावापूर्वी सर्व १० संघांकडे शिल्लक असलेले पैसे –

सनरायझर्स हैदराबाद – ४२.२५ कोटी
पंजाब किंग्स – ३२.२ कोटी
लखनौ सुपर जायंट्स – २३.५५ कोटी
मुंबई इंडियन्स – २०.५५ कोटी
चेन्नई सुपर किंग्ज – २०.४५ कोटी
दिल्ली कॅपिटल्स – १९.४५ कोटी
गुजरात टायटन्स – १९.२५ कोटी
राजस्थान रॉयल्स – १३.२ कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – ८.७५ कोटी
कोलकाता नाइट रायडर्स – ७.०५ कोटी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The ipl 2023 mini auction does not include a single indian player in the rs one point five crore price group vbm
First published on: 02-12-2022 at 15:01 IST