Smriti Irani’s Favorite Cricketer MS Dhoni : केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी यांना क्रिकेट आवडते. त्यांनी आपल्या आवडत्या क्रिकेटरचा खुलासा केला आहे. कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनी हा त्यांचा फेवरेट क्रिकेटर आहे. स्मृती इराणी यांनी हा खुलासा नुकताच केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान हा खुलासा केला. माजी टीव्ही अभिनेत्री स्मृती इराणी सध्या केंद्र सरकारमधील अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे खाते सांभाळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर एका प्रश्नोत्तराच्या सत्रात आवडत्या क्रिकेटपटूबद्दल कोण असल्याचे सांगितले. एमएस धोनीचे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे. त्याने टीम इंडियासाठी ३ आयसीसी विजेतेपद पटकावले आहेत. यामध्ये २००७ टी-२० विश्वचषक, २०११चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे.

चेन्नई सुपर किंग्जला पाचवेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली –

स्मृती इराणी यांची इन्सटाग्राम स्टोरी

टीम इंडियाशिवाय महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला ५ वेळा जिंकले आहे. तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासह आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. २०२३ च्या शेवटच्या हंगामात, धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला.

हेही वाचा – मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूचे उघडले नशीब, पहिल्यांदाच वनडे आणि टी-२० संघात मिळाले स्थान

महेंद्रसिंग धोनीची क्रिकेट कारकीर्द –

महेंद्रसिंग धोनीची क्रिकेट कारकीर्द अतिशय नेत्रदीपक राहिली आहे. त्याने २००४ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ४२ वर्षीय धोनीने २०१९ मध्ये टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. त्याने ९० कसोटीत ४८७६ धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर ३५० वनडेमध्ये १०७७३ धावा आहेत. त्याचबरोबर धोनीने ९८ टी-२० सामन्यात १६१७ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs WI: मालिका गमावल्याने माजी खेळाडूने भारताच्या बॅटिंग ऑर्डरवर उपस्थित केला सवाल; विचारले, संजूला पाचव्या क्रमांकावर का पाठवले?

महेंद्रसिग धोनीने झळकावली एकूण १६ शतके –

महेंद्रसिंग धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण १६ शतके आणि १०६ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने कसोटीत ६ शतके आणि एकदिवसीय सामन्यात ७३ अर्धशतके केली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister smriti iranis favorite cricketer is mahendra singh dhoni vbm