WTC 2023 Final India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक रंजक घटना घडली, जेव्हा सिराजने बॉलिंग करताना मुद्दाम स्टीव्ह स्मिथच्या दिशेने चेंडू फेकला तेव्हा त्या दोघांमध्ये थोडीसी शाब्दिक चकमक झाली. स्मिथने दुसऱ्या दिवशी ९५ धावांवर पुढे खेळायला सुरुवात करून पहिल्याच षटकात सिराजच्या दोन चेंडूत सलग दोन चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. या घडलेल्या घटनेवर रवी शास्त्री आणि गावसकर यांनी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिराज त्याच्या षटकाचा चौथा चेंडू टाकण्यास तयार होता, तो पूर्ण धाव घेऊन आला. मात्र, स्मिथ गोलंदाजी करण्यापूर्वीच निघून गेला. अशा स्थितीत सिराजने रागाने चेंडू त्याच्या दिशेने फेकला आणि जवळ जाऊन काही शब्द बोलले. त्याला स्मिथनेही प्रत्युत्तर दिले. खरंतर स्मिथला स्पायडर कॅमेऱ्याचा काही त्रास होत होता. या कारणास्तव, तो चेंडू खेळण्यापूर्वीच निघून गेला. भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांनी या प्रकरणी सिराजची जोरदार निंदा केली आहे.

माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर म्हणाले, “हे काय चालले आहे, हा दिवसाचा फक्त दुसरा-तिसरा चेंडू आहे आणि आतापासून सिराज आपला संयम गमावत आहे.” भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या घटनेवर स्टीव्ह स्मिथची बाजू घेतली आणि ते म्हणाले, “स्मिथला माघार घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, सिराजला ते आवडले नाही म्हणून काय. शेवटच्या दोन चेंडूंमध्ये चौकार मारल्याने त्याने अशाप्रकारे नाराजी व्यक्त केली आणि ती चुकीची आहे.” बॉलपूर्वी रोहित शर्माही सिराजवर नाराज होता.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धावसंख्या १४२ धावांनी वाढवली आणि डाव ४६९ धावांवर संपवला. मोहम्मद सिराजने चार विकेट घेतल्या. भारताने चहापानाच्या विश्रांतीपूर्वी १० षटके खेळली, ज्यामध्ये त्यांना कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या रूपाने दोन मोठे झटके बसले. या सामन्यात दोन दिवसांचा खेळ संपला आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच गडी गमावून १५१ धावा केल्या होत्या. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाकडून ३१८ धावांनी पिछाडीवर आहे. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला २६९ धावा म्हणजे आणखी ११८ धावा करायच्या आहेत.

हेही वाचा: WTC Final 2023: “टीम इंडिया फक्त…”, WTC फायनलमधील भारताच्या खराब कामगिरीसाठी रमीझ राजाने आयपीएलला धरले जबाबदार

भारताच्या धावसंख्येने सहा विकेट्सवर २०० धावा केल्या

भारताच्या धावसंख्येने सहा विकेट्स गमावून २०० धावा ओलांडल्या आहेत. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर चांगल्या गतीने धावा करत टीम इंडियाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांमध्ये सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली आहे. ५० षटकांनंतर भारताची धावसंख्या ६ बाद २१५ आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happened gavaskar shastri reprimanded siraj for throwing the ball the bowler said i my fault avw